Latest Marathi News : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालंय.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal
Updated on

BYJUच्या सीईओला शेअर होल्डर्सनी पदावरुन हटवलं; निर्णयांबाबत केले अनेक आरोप

BYJU च्या विशेष सर्वसाधारण सभेत गुंतवणूकदारांनी सीईओ बायजू रविंद्रन यांच्याविरोधातील सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तसेच रविंद्रन यांना सीईओपदावरुन हटवण्यासाठीचा आणि नेतृत्वबदलाचा प्रस्तावही मांडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय बायजूजमध्ये गव्हर्नन्स, आर्थिक मिसमॅनेजमेंट आणि तक्रारींशी संबंधित प्रस्ताव मान्य झाले आहेत.

सब्यसाची घोष यांच्याशी काही संबंध नाही! पश्चिम बंगालमध्ये भाजपने केले हात वर

हावडा येथे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगाल पोलिसांनी सब्यसाची घोष यांना अटक केली आहे. दरम्यान यांच्याशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार भारतीय जनता पक्ष (भाजप)ने केला आहे. पश्चिम बंगाल भाजपाने निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.

Navi Mumbai : अश्वमेध महायज्ञ कार्यक्रमाला संरक्षण मंत्र्यांसह,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये ४७ व्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून ह्या कार्यक्रमला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

या महायज्ञात १००८ कुंडात एका वेळी १० हजारांहून अधिक लोक यज्ञात हवन करणार आहेत. तसेच प्रदीर्घ काळापासून अभ्यास करणारे महान विद्वान हा यज्ञ करणार आहेत. या महायज्ञात सर्व जाती-पंथांची लोक उपस्थित आहेत.. हिमालयातील दिव्य तीर्थक्षेत्रांची झलक प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. तसेच सनातन संस्कृतीच्या प्रवर्तकांचे भव्य आणि विहंगम पुतळे पहायला मिळणार आहेत.

Gujarat: गुजरातमधील पोलिसांनी 300 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉईन ड्रग्ज केले जप्त  

Gujarat: गुजरातमधील गीर सोमनाथ पोलिसांनी वेरावळ येथून सागरी मार्गाने तस्करी करण्यात आलेले 300 कोटी रुपयांचे 50 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केले आहे.

Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ टाकल्याप्रकरणी माजी खासदार अमर साबळे यांनी पोलिसात दाखल केली तक्रार

Pimpri Chinchwad: यूट्यूबवर पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ टाकल्याप्रकरणी माजी खासदार अमर साबळे यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शिवाजी पार्क स्मशान भूमीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव दाखल

शिवाजी पार्क स्मशान भूमीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव दाखल झालं आहे. सुशीलकुमार शिंदे, उध्दव ठाकरे, संजय राउत, अनिल देसाई देखील तिथे उपस्थित आहेत.

सत्तेला हापापलेले लोक आम्ही नाहीत - अजित पवार

"सत्तेला हपापलेले लोक आम्ही नाहीत, प्रश्न सुटले पाहिजेत बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी लोक असे बोलतात," असं देखील अजित पवार म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून राज्यातील 252 विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती..

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

Farmers Protest LIVE: तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कलम 302 नुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी

शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर म्हणाले की, जोपर्यंत मृत शेतकऱ्याच्या आरोपीवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंढेर म्हणाले, ' पोलीस आणि प्रशासनाने आमच्या तरुणाला शहीद केले, त्याला न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

PM Modi LIVE: पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला

वाराणसी, उत्तर प्रदेशमध्ये भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणामुळे उत्तर प्रदेश विकासात मागे राहिला. पूर्वीच्या सरकारांनी यूपीला आजारी राज्य बनवले, तरुणांकडून त्यांचे भविष्य हिसकावून घेतले. काँग्रेसचा राजकुमार म्हणतो काशीचे तरूण आणि यूपीचे तरूण ड्रग्सचे व्यसनी आहेत. भान गमावलेले लोक यूपीच्या मुलांना मादक काशी म्हणत आहेत. मोदींना शिव्या देत आहेत.

आंदोलन हिंसक होणार नाही? याची जबाबदारी घेणार का? मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका!

मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण लागू केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच उद्यापासून त्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलन हिसंक होणार नाही? याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? असे सवाल करत नोटीस बजावली आहे.

भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदा नांदेडमध्ये दाखल; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदा नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून येत आहे. चव्हाणांचं मोठ्या आनंदात नांदेडमध्ये स्वागत करण्यात आलं आहे.

लोकसभेच्या तोंडावर अमित ठाकरे का उतरले पुण्याच्या रस्त्यांवर?

आगामी निवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखायला सुरवात केली आहे. अशातच इतर पक्षांप्रमाणे मनसेने देखील आपल्या हालचाली सुरू केल्या आहे. राज ठाकरे दौरे, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, तर अमित ठाकरे विद्यार्थी आणि तरूणांसाठी पुण्याच्या रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात धडक मोर्चा काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज शुक्रवारी (ता. २३) पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढला आहे.

आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिला अखेरचा निरोप

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि त्यांची आई रश्मी ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना अखेरचा आदर दिला आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

राज्यपाल रमेश बैस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिला अखेरचा निरोप

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप दिला आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Latest Marathi News Live Update : पुणे विद्यापीठावर मनसेच्या मोर्चामुळे SB रोडवर ट्रॅफिक जॅम, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा येत असल्याने सेनापती बापट रोड एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जॅम झाले आहे. ज्या मुलांची शाळा 1 वाजता सुटते अशा मुलांना घरी पोहचायला खूप उशीर होणार आहे. त्यामुळे पालक देखील चिंतेत आहेत. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मुलांचे हाल होत आहेत. जेवणाचा देखील खोळंबा झाला आहे.

हावडाहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आचानक निघाला धूर

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरच्या राजबंध रेल्वे स्थानकावर दुरांतो एक्स्प्रेसमधून धूर निघताना दिसला. ट्रेन हावडाहून दिल्लीला जात होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी धूर आटोक्यात आणला आणि त्यानंतर ट्रेनने आपला पुढील प्रवास सुरू केला.

बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब- आशिष शेलार

मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने गती पकडली असून आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांनी आज मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ केला. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला आज मंत्री महोदयांनी सुरूवात करुन दिली. हे काम अडीच वर्षापूर्वीच सुरू व्हायला हवं होतं. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने याला विरोध केला, कामाला परवानगी दिली नाही आणि जनतेची अडीच वर्षे फुकट गेली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीचं पापही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारकडे जातं.

मनसेचा पुणे विद्यापिठावर मोर्चा

मनसेने अनेक मागण्यांसाठी पुणे विद्यापिठावर मोर्चा काढला आहे.

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत विविध भूमीपूजनं 

सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत विविध भूमीपूजनं करण्यात आली.

MNS: मनसेची मागणी निवडणुक आयोगाने केली मान्य

मनसेने निवडणुक आयोगाकडे केलेली मागणी आयोगाने मान्य केली आहे. निवडणुकीच्या कामात शिक्षकांना सामावून घेण्यात येणार नाहीये.

BJP News: चंद्रशेखर बावनकूळे यांनी वाहिली मनोहर जोशींना श्रद्धांजली 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अनुभवी नेता गमावला आहे. जोशी सरांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.आशी श्रद्धांजली चंद्रशेखर बावनकूळे यांनी ट्विटरद्वारे मनोहर जोशींना वाहिली 

PM Modi On Manohar Joshi : पंतप्रधान मोदींनी वाहिली मनोहर जोशींना श्रद्धांजली 

"मनोहर जोशी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मनोहर जोशी एक दिग्गज नेते होते ज्यांनी जनसेवेत वर्षे घालवली आणि महानगरपालिका, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या...अशी श्रद्धांजली पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे मनोहर जोशींना वाहिली 

MNS on Election: निवडणुकीत ५ दिवसांपेक्षा जास्त शिक्षकांना जुंपू नये, मनसेची मागणी

निवडणुकीच्या कामात शिक्षकांना ५ दिवसांपेक्षा जास्त जुंपू नये, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे.

MLA Rajendra Patni Passed Away: आमदार राजेंद्र पाटनी यांचं निधन

MLA Rajendra Patni Demise: कारंज्याचे आमदार राजेंद्र पाटनी यांचं निधन दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे.

मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते- उद्धव ठाकरे

शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते." मनोहर जोशींच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत.

Pune : पुणे ड्रग्स प्रकरणात घेतली जाणार इंटरपोलची मदत  

पुणे ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे ड्रग्स प्रकरणी आता संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस कढण्यात आली आहे. तर या प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे.

इगतपुरीतील भावली धरणात फक्त ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक

इगतपुरीतील भावली धरणात फक्त ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची समस्या भेडसाऊ शकते.

ठाकरेंचा बुलढाणा दौरा रद्द

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी याचं निधन झाल्याने उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौरा रद्द करण्यात आला आहे.

अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर धडकणार मोर्चा

आज अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले विद्यापीठावर मोर्चा धडकणार आहे.

भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील- सुनेत्रा पवार

भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील, असं सूचक वत्तव्य सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या खासगी अंतराळ संशोधन संस्थेनं रचला इतिहास, चंद्रावर उतरवलं पहिलं खासगी मून लँडर

अमेरिकेची खासगी अंतराळ संशोधन संस्था इंट्यूटिव्ह मशीन्सने नवा इतिहास रचला आहे. कंपनीच्या ऑडिसियस स्पेसक्राफ्टने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून दाखवलं आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी हे यान चंद्रावर उतरलं. एखाद्या खासगी कंपनीने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

Marathi News LIVE Updates
Odysseus lands on moon : चंद्रावर उतरलं अमेरिकेचं पहिलं खासगी मून लँडर; भारताच्या 'विक्रम'ला मिळाला शेजारी!

मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, हा आरोप चुकीचा - जयंत पाटील

मुंबई :  मनोज जरांगे यांच्याशी शरद पवार यांचा संपर्क नाही, त्यामुळे त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत हा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं. 

मनोहर जोशी सर शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना जगले - संजय राऊत

मनोहर जोशी सर शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना जगले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्व संसदीय पदापर्यंत काम केलं, ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले. बाळासाहेबांचे ते विश्वासू व्यक्तिमत्व होते, अशी भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला - नितीन गडकरी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. ठाकरे यांचा बुलढाणा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, बुलढाण्यातील सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत.

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज शिराळा, वाळवा दौऱ्यावर

इस्लामपूर : राम मंदिराचा उत्कृष्‍ट पद्धतीचा नियोजनबद्ध असा सोहळा बूथ प्रमुखांनी आयोजित केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ‘गाव चलो अभियान’ राबवले आहे. याला अनुसरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज शुक्रवार ता. २३ रोजी शिराळा व वाळवा तालुका दौरा करणार आहेत, अशी माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Congress MLA : काँग्रेस आमदार मामन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार मामन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील नुह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदारावर UAPA खाली गुन्हा नोंद केला आहे. याआधी भारतीय दंडविधान संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.

मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरेंचा आजचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. कारण, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज निधन झाल्यामुळे त्यांच्या बुलढाणा दौऱ्यात बदल होऊ शकतो. स्थानिक नेत्यांशी ठाकरेंची चर्चा सुरु आहे.

Kolhapur News : 'मी गाडगेबाबा : मिशन स्वच्छ कोल्हापूर’ अभियान आज

कोल्हापूर : शहर प्लास्टिक कचरामुक्त करण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) हजारो कोल्हापूरकर एकवटणार आहेत. ‘मी गाडगेबाबा : मिशन स्वच्छ कोल्हापूर’ या अभियानाच्या माध्यमातून सकाळी सात ते आठ या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर स्वच्छता मोहीम होणार आहे.

Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

Gujarat Police : मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू सलमान आझरी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

मोदासा (गुजरात) : वादग्रस्त विधान केल्याचा आरोप असलेले मुंबईतील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान आझरी यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर लगेचच गुजरात पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले. आझरी यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मोदासा येथे एका सभेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांना काही अटींसह जामीन मंजूर झाला होता.

Election Commission : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे. तसेच ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अभिनयसम्राट अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शंभू आणि खानौरी सीमाभाग रणक्षेत्र बनला आहे. तसेच महाराष्ट्रात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. मराठा आरक्षणावरही वाद-प्रतिवाद सुरु आहेत. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

Marathi News LIVE Updates
'Turha' Sharad Pawar Party New Symbol: शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()