Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

शेतकरी आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं असून पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे.
Live Update
Live UpdateEsakal
Updated on

उद्या काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक- बाळासाहेब थोरात

उद्या काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

२० तारखेच्या विशेष अधिवेशनास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

PM Modi in UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबूधाबीतील हिंदू मंदिराचे झाले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबूधाबीतील स्वामीनारायण मंदिराजे आज लोकार्पण करण्यात आले. तब्बल २७ एकर परिसरात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

Kisan Mazdoor Sangharsh Committee: केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पुन्हा बैठक

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये उद्या सायंकाळी पाच वाजता बैठक होईल. यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती किसान मजदूर संघर्ष कमितीचे सचिव सरवन सिंग पंढेरे यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वामीनारायण मंदिरात केली पूजा; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबूधाबीतील हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांनी स्वामीनारायण संस्था मंदिरात पूजा केली आहे.

पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार असलेले अबूधाबीतील हिंदू मंदिराचा व्हिडिओ पाहा

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी अबूधाबीतील हिंदू मंदिरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी अबूधाबीतील BAPS मंदिरात दाखल झाले आहेत.

Latest Marathi News Live Update : अक्षय कुमार अबू धाबीत दाखल, BAPS मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित

अभिनेता अक्षय कुमार हा अबू धाबीत दाखल झाला आहे. अबूधाबीतील बीएपीएस मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला अक्षय कुमार देखील उपस्थित राहणार आहे.

Latest Marathi News Live Update : शरजील इमान जामीन प्रकरणी दिल्ली कोर्टानं निकाल राखून ठेवला

दिल्ली न्यायालयाने शरजली इमान जामीन प्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे. शरजील इमाम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जामीन देण्याबाबतचा निर्णय 17 फेब्रुवारीला देण्यात येईल.

Latest Marathi News Live Update : विशेष अधिवेशन २० तारखेला होणार

महाराष्ट्र सरकार 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News Live Update : काँग्रेसची कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगानामधील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर 

काँग्रेसने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगाना राज्यातील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने कर्नाटकमधून अजय माकन, डॉ, सैयद नसीर हुसैन आणि जीसी चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. तर मध्य प्रदेशमधून अशोक सिंग यांना उमेदवारी दिली. तेलंगानामधून रेणुका चौधरी आणि अनिल कुमार यादव यांना राज्यसभा उमेदवारी देण्यात आली आहे.

Latest Marathi News Live Update : हा तर शेतकऱ्यांचा अधिकार... दिल्ली चलो आंदोलनावर शशी थरूरांच वक्तव्य

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनावर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार अधिकार आहे. दिल्लीच्या सीमांना प्रकारे किल्ल्याच्या तटबंदीचं स्वरूप आलं आहे तसं चित्र चीनसोबतच्या बॉर्डरवर देखील नसेल.

J. P. Nadda: भाजपने गुजरातमधून जेपी नड्डा यांना राज्यसभेसाठी दिली उमेदवारी

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. पक्षाने गुजरातमधून जेपी नड्डा आणि महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी 13 फेब्रुवारीलाच भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि अजित गोपचाडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

जेपी नड्डा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
जेपी नड्डा यांना राज्यसभेसाठी उमेदवारीSakal

Manoj Jarange: सरकार मनोज जरांगे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे; या कारणावरुन धाराशिवमध्ये एसटी बसवर दगडफेक

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांची बंदची हाक दिली आहे. यातच आता सरकार मनोज जरांगे यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे या कारणावरुन धाराशिवमध्ये एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केला आहे.

भाजपकडून राज्यसभेचे तीन उमेदवार जाहीर; राणेंचा पत्ता कट

भाजपकडून राज्यसभेचे तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी यावेळी नुकताच पक्षप्रवेश झालेले अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.

१) अशोक चव्हाण

२) मोधा कुलकर्णी

३) अजित गोपछडे

या नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देण्याची चर्चा

काँग्रेसच्या उमेदवारामुळे भाजपची यादी रखडली. चौथा उमेदवार द्यायचा का यावर वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे. भाजप चौथा उमेदवार देणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. काँग्रेसनं राज्यातील दलित चेहरा चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिल्यानं ही चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या तीन नावांवर शिक्कामोर्तब झालंय मात्र, चौथा उमेदवार कोण असेल? याची चर्चा सुरु झालीए.

जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणस्थळी सलाईन लाऊन उपचार सुरु

मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. आता उपोषणस्थळी सलाईन लाऊन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राष्ट्रवादी विलनीकरणाची चर्चा निरर्थक आणि खोटी - काँग्रेस प्रभारी चेन्नितला

राष्ट्रवादी विलनीकरणाची चर्चा निरर्थक आणि खोटी असल्याचं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांनी स्पष्ट केलं आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली, अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नसल्याचं चैन्नितला यांनी म्हटलं आहे.

लालबहादुर शास्त्रींच्या नातवानं काँग्रेसच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नातवानं काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

बांदलांना शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शुभेच्छा; अमोल कोल्हेंचा टोमणा 

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या विलिनीकरणाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार आहे. शिरूरमधून बांदल यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शुभेच्छा अशा शब्दांत त्यांनी टोमणाही मारला. आमच्याकडं चिन्ह अनेक आहेत पण पर्याय एकच आहे. लोकांपर्यंत जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी मेळावे आणि बैठका घेतल्या जाणार आहेत, असं पुण्यातील पक्षाच्या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

सोनिया गांधींनी राज्यसभेसाठी दाख केला अर्ज

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा दिला पर्याय

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये कपबशी, शिट्टी आणि वडाचं झाड या चिन्हांचा समावेश आहे. यांपैकी एक कुठलंही चिन्हा शरद पवार गटाला मिळू शकतं.

राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी सोनिया गांधी विधानभवनात दाखल

राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी सोनिया गांधी राजस्थान विधानसभेत दाखल झाल्या आहेत.

काँग्रेसमध्ये विलीन होण्यावर शरद पवार गटाची चर्चा सुरु

शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी मोठं विधान केलय. काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

पुण्यात शरद पवार गटाची बैठक, काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता

पुण्यात शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शरद पवार विरुद्ध अजित पवार, सुप्रीम कोर्टात केलेली याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका तांत्रिक त्रुटींमुळे डिफेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आली आहे.

भाजपकडून राज्यसभेसाठी ८ राज्यांची यादी जाहीर

राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून ८ राज्याच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातून कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Traffic Update:  मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मोठी वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुबंई गुजरातकडे जाणारे दोन्ही मार्ग गेल्या ४ तासांपासून ठप्प आहेत.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षेत वाढ

दिल्लीच्या टिकरी बॉर्डर, सिंगू बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसह दंगलविरोधी वाहने तैनात करण्यात आली आहेत. तिन्ही सीमेवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

Maharashtra Politics: वर्षा बंगल्यावर रंगली महायुतीची खलबतं; शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये मध्यरात्री चर्चा

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना वर्षा बंगल्यावर मंगळवारी (१३ फेब्रुवारी) मध्यरात्री महायुतीची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत एक मोठा निर्णय झाल्याचे वृत्त साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची तब्येत खालावली; आजचा उपोषणाचा पाचवा दिवस

मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे. त्यांचा आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. १० तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग करून उपोषणाला सुरूवात केली. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.

NCP MLA Disqualified Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला; संपूर्ण राज्याचं लक्ष

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाकडं आता राज्याचं लक्ष आहे. शरद पवारांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे.

Former MP Jaya Prada : माजी खासदार जयाप्रदा यांना अटक करण्याचे आदेश, अजामीनपात्र वॉरंटसह पोलीस गुंतले शोधात

माजी खासदार आणि सिनेस्टार जया प्रदा पुन्हा एकदा आचारसंहिता उल्लंघनाच्या दोन प्रकरणांमध्ये न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्यावर कडक भूमिका घेत न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयानं पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी 27 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट घेऊन अभिनेत्रीचा शोध सुरू केला आहे.

गिरणी कामगारांचा जमून मंत्रालयावर आज धडक मोर्चा

मुंबई : आम्हाला हक्काची घरे द्या, घरासाठी सरकारी, महसुली जमिनी मुंबईत द्या, ज्या गिरण्यांनी जमिनी दिल्या नाहीत, त्यांच्या जमिनी ताबडतोब ताब्यात घ्या, असा आक्रोश करत गिरणी कामगार शासन दरबारी आपला संताप व्यक्त करणार आहेत. सर्व गिरणी कामगार बुधवारी (ता. १४ ) सकाळी आझाद मैदान येथे जमून मंत्रालयावर धडक मोर्चा नेणार असल्याची गिरणी कामगार संघर्ष समितीने दिली.

Farmers Protest : हरियाणातील 7 जिल्ह्यांत 15 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनं मंगळवारी सात जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट आणि बल्क मेसेजिंग सेवेवरील निलंबन दोन दिवसांनी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवलंय. अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा येथे ही बंदी कायम राहील, असं सरकारनं एका आदेशात म्हटलंय. दुसरीकडे, शंभू आणि खनौरी सीमेवर पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर अनेक शेतकरी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारनं हरियाणाच्या सीमेवर अलर्ट जारी केलाय.

Lloyd Austin : अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

वॉशिंग्टन : यूएस संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना मंगळवारी दुपारी 3:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) वॉल्टर रीड नॅशनल मेडिकल सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यूएस संरक्षण विभागानं एका निवेदनाव्दारे ही माहिती जाहीर केलीये.

Indonesia Election : नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी इंडोनेशियात मतदानाला सुरवात

जकार्ता : इंडोनेशियामध्ये आज 200 दशलक्षाहून अधिक मतदारांनी नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान करण्यास सुरवात केली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आज नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरु आहे.

Rajya Sabha Election : राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आज (बुधवार) बसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही जयपूरला येणार आहेत. सर्व नेते दिल्लीहून दोन चार्टर विमानांनी जयपूरला पोहोचतील आणि विमानतळावरून विधानसभेत जातील. सोनिया गांधी यांच्या जयपूरमध्ये आगमनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरला बोलावलं आहे.

Farmers Agitation : शेतकरी आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण

Latest Marathi News Live Update : शेतकरी आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलंय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तसेच आज व्हॅलेंटाईन डे आहे. मराठा आरक्षप्रश्नी पिंपरी चिंचवड बंद, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.