मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
Mumbai News : गिरगावच्या वैद्यवाडी परिसरातील दीडशे वर्षांपेक्षाही अधिक जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर उघडण्याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. मंदिराच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये दिल्याचेही लोढा यांनी सांगितले आहे.
नगर परिषदेतील शहर समन्वयकाला रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्या तरुणीसह तिच्या तीन साथीदारांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ३१ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ हा प्रकार घडला होता.
सिने कलाकर अभिजीत बिचुकलें यांना कल्याणमध्ये ८५५ मते मिळाली आहेत.
नाशकात पिंपळगावजवळ शिरसगाव येथे हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले आहे. पायलट पॅरेशुट काढून बाहेर पडला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांची जादू संपल्याचं दिसत आहे. १७४ विधानसभेच्या जागापैकी वायएसआर फक्त २५ जागांवर आघाडीवर आहे, तर तेलगु देसम पार्टी १२५ जागांवर आघाडीवर आहे.
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स 6000 अंकांनी पडलाय, निफ्टी 1900 घसरली आहे.
ओडिशा विधानसभेच्या निकालामध्ये भाजप चांगली कामगिरी करत आहेत. भाजपने ८३ जागांवर आघाडी घेतलीये, तर बिजू जनता दलाने ४५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे भाजप, टीडीएस, जेएसपी आघाडीला १४५ जागांवर आघाडी मिळाली आहे. याठिकाणी विधानसभेच्या एकूण १७५ जागा आहेत.
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांचे १४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
ओडिशात विधानसभेच्या १४७ जागा आहेत. यात भाजप ३४ तर बिजू जनता दल २० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशच्या विधानसभेची मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या कलानुसार तेलगु देसम पार्टी ५० जागांवर आघाडीवर आहे, तर जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर हा ११ जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेचे सुरुवातीचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. १७५ पैकी ३० जागांवर तेलगु देसम पार्टी आघाडीवर आहे.
ओडिशामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेसाठी मतमोजणी सुरु आहे. राज्यात १४७ विधानसभेच्या जागा आहेत. ताज्या कलानुसार, बिजू जनता दल आघाडीवर दिसत आहे.
आंध्र प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि एनडीए आघाडीवर आहे. जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर पक्ष पिछाडीवर आहे.
मान्सूनची चांगली वाटचाल सुरु असून दोन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ ते ५ डिग्री तापमानात घट झाली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.