Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Latest News In Maharashtra Read in Marathi Here: देश-विदेश, राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

Pune Gym Fire Live: पुण्यात जीमला आग, लाखोंचे नुकसान

पुण्यात धानोरी रोडवरील एका जीमला भीषण आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जीमचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

NEET Paper Leak Live: नीट पेपर लीक प्रकरणी बिहारमधील सहा आरोपी कोर्टात हजर

#NEETUG पेपर लीक प्रकरणात बिहार पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींना आज पाटणा येथील आर्थिक गुन्हे युनिट न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने काल सहा आरोपींना देवघर, झारखंड येथून अटक केली होती.

Latest Marathi News Live : उद्यापासून संसदेचे अधिवेशन, पहिल्या दिवशी एकूण २८० खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली : उद्यापासून संसदेचे अधिवेशन आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य शपथ घेणार आहे. पहिल्या दिवशी एकूण २८० खासदार शपथ घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १४ खासदार पहिल्या दिवशी शपथ घेणार तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ३४ खासदार शपथ घेणार.

Chhattisgarh live : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Chhattisgarhधमतरी, छत्तीसगड: खल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील अमझर आणि मुहकोट गावातील जंगलात दुपारपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.

Pune Drug Case live : पुणे ड्रग्ज प्रकरणात ५ जण ताब्यात, सीसीटीव्ही देखील जप्त

पुणे ड्रग्ज प्रकरणात ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही देखील जप्त. हॉटेल मालकाला देखील ताब्यात घेतलं आहे.

Arvind Kejriwal live: अरविंद केजरीवालांची जामिनावर स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयाने घातलेल्या स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी उद्या सकाळी सुनावणी घेण्याचे आवाहन केले आहे.

NEET UG live: इंडियन मेडिकल असोसिएशनने मानले नरेंद्र मोदींचे आभार

इंडियन मेडिकल असोसिएशन (मुख्यालय) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय एचएम अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.

NEET UG परीक्षेतील "अनियमितता" चा तपास सखोल तपासासाठी CBI कडे हस्तांतरित केल्याबद्दल आम्ही शिक्षण मंत्रालयाचे आभार मानतो.

IED blast in Chhattisgarh live : सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED स्फोटात दोन जवान ठार

छत्तीसगड: सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पीएस हद्दीतील सिल्गर आणि टेकुलागुडेम दरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED स्फोटात CRPF CoBRA 201 बटालियनचे 2 जवान शहीद झाले: पोलीस

Pune Accident Live : पुण्यातील यवत येथे एसटी बस झाडावर आदळली २२ जण जखमी

पुणे जिल्ह्यातील यवत गावातील सहजपूर फाट्याजवळ राज्य परिवहन बस झाडावर आदळल्याने 20 ते 22 प्रवासी जखमी झाले. २ ते ३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे:. अशी माहिती नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत, पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण पोलीस यांनी दिली आहे.

NEET Controversy live: CBI ने नोंदवली पहिली एफआयआप

NEET प्रवेश परीक्षेतील कथित पेपर लीकप्रकरणी CBI ने FIR नोंदवली असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे घेणार बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत बैठक घेणार आहेत. बैठकीला मनसेचे नेते आणि सरचिटणीस उपस्थितीत राहणार आहेत.

जामगे गावातील रस्ता 150 मीटर खचला

रत्नागिरी - दापोली या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्‍या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खोल खचलाय. रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद कण्यात आली आहे.

Pune : पुणे नगर महामार्गावर एस टी बसची पादचाऱ्याला धडक; जागीच मृत्यू

एस टी बसची पादचाऱ्याला धडक बसल्याने ४० वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वाघोलीत पुणे नगर महामार्गावर एस बी आय बँकेसमोर समोर घडली. राजगुरुनगर ते पैठण ही बस होती.

Vasai : वसईतील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी 70 कोटींचा निधी!

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील तब्बल 11 धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. या कामांसाठी अंदाजित 70 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र निवडणुकीनिमित्ताने लागलेल्या आचारसंहितेमुळे या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे, अशी माहिती पालघर जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

Cha. Sambhji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडगाव येथे शनिवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं. शेतात पावसाचं पाणी शिरल्याने बंधारे फुटून पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, दोघांचेही मृतदेह सापडले

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचे मृतदेहही सापडले आहेत. अजूनही चकमक सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमधील गोहलन भागात नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले.

Pandharpur news: विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे मुळ रूप देण्याचे काम सुरू असून विठ्ठल आणि रूक्मिणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. याच नव्या रुपातील विठ्ठल मंदिरात येत्या 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे.

Crime News: बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी पळवलेले एटीएम

बीडच्या धारूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन 4 चोरांनी अवघ्या 2 मिनिटात काढत, पिकअपला बांधून पळवल्याची घटना काल शनिवारी घडली होती. तर ही एटीएम मशीन पळवून घेऊन जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले होते.

Crime News: देहूमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच

देहूमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठ दिवसात देहूगाव मध्ये आठ ते दहा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मुख्य चौकातील अनेक दुकाने आतापर्यंत चोरट्यांनी फोडली असून यात लाखो रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे. मात्र एका मोबाईल शॉपी मध्ये चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Manoj Jarange Patil: मुस्लीम, ब्राह्मण यांच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मुस्लीम, ब्राह्मण यांच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत, असं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Mumbai: मुंबईत पावसाने थैमान घातला

Mumbai: मुंबईच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.

Maonj Jarnge Live: माझी प्रकृती आता बरी, काळजी नसावी- मनोज जरांगे

माझी प्रकृती आता बरी आहे. काळजी करण्याचे कारण नाही. आज दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे जाणार आहे. सरकार नोंदी नाकारू शकत नाही. हैदराबाद संस्थानमध्ये नोंदी आढळल्या आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.

Omprakash Rajenimbalkar Live: खासदार ओमराजे निंबाळकर शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातील मोदीबागेत दाखल झाले आहेत. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sambhajinagar Live: संभाजीनगर अंगुरीबाज येथे दोन गटात राडा

संभाजीनगर अंगुरीबाज येथे दोन गटात राडा पाहायला मिळाला आहे. गाडीला कट लागल्यामुळे दोन घट भिडले आहेत. यात चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Kalyan Live: कल्याणमध्ये अजित पवार गटाकडून मेळाव्याचं आयोजन

कल्याणमध्ये अजित पवार गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Mumbai MVA Meeting Live: सोमवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक

सोमवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीमध्ये जागा वाटपासंबंधात चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी यासंदर्भात अहवाल मागितला असल्याची माहिती आहे.

Mumbai Local Live: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. विविध कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहिती आहे. याकाळात काही विशेष रेल्वेगाड्या सुरू असतील.

Sindhudurg Rain Update Live: सिंधुदुर्गला रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील विविध ठिकाणी आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर-सांगलीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दोघांना चिरडलंय, त्यात एकाचा मृत्यू झालाय. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com