Latest Marathi News Update: मनोज जरांगेंचे फडणवीसांवर आरोप ते उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन, दिवसभरातील सर्व बातम्या एका क्लिकवर...

षडयंत्र करून डाव यशस्वी होणार नाही. समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. - मनोज जरांगे
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal
Updated on

नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळे पर्यावरणाची हानी - आदित्य ठाकरे

पुणे, ता. २५ : ‘‘सजग पुणेकरांनी आवाज उठविल्याने वेताळ टेकडीवरील प्रकल्पाला स्थगिती मिळाली. नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळेही पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे अशा कामाविरुद्ध जनतेने आता आवाज उठवला पाहिजे. तरच सरकार आणि प्रशासन जागे होईल, ’’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

मनोज जरांगे भांबेरी गावात दाखल, गावकरी म्हणाले आधी उपचार घ्या, नंतर मुंबई...

मनोज जरांगे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांना भांबेरी गावात गावकऱ्यांनी अडवले आहे. आधी उपचार घ्या, असे गावकरी म्हणाले.

जरांगेंनी तोंड सांभाळून बोलायला हवं- प्रवीण दरेकर

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे.

Latest Marathi News Live Update : जरांगे आक्रमक, सागर बंगल्याच्या दिशेनं रवाना!

मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक होत मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. काहीही झालं तरी आपण सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

जरांगे काय म्हणालेत हे ऐकून प्रतिक्रिया देणार - फडणवीस

मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी आपण ते आरोप काय आहेत हे अजून ऐकलेलं नाही. ते ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देईल. असे फडणवीस म्हणाले आहेत.

मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून निघाले; ग्रामस्थांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. ग्रामस्थांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते मी सागर बंगल्यावर जाणार या आपल्या मागणीवर ठाम आहेत.

जरांगे आक्रमक; सागर बंगल्याकडे जातो म्हणत झाले आक्रमक

मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मी देवेंद्र फडणवीसांकडे जातो म्हणत ते आक्रमक झाले तेव्हा जमलेले लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

खुमखुमी असेल तर समोर यावं, मनोज जरांगेंचं फडणवीसांना आव्हान

मनोज जरांगेंनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. जरांगे म्हणाले की खुमखुमी असेल तर फडणवीसांनी समोर यावं.

जरांगेंचे उपमुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. जरांगे म्हणाले की, "माझी बदनामी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी टोळी उभी केली. "

मराठा समाजाशी गद्दारी करु शकत नाही- मनोज जरांगे

मनोज जरांगे यांच्यावर अजय बारसकर यांच्याकडून आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा समाजावर माझी निष्ठा आहे. समाजाशी गद्दारी करु शकत नाही. "

निवासी डॉक्टरांचा चौथ्या दिवशीही संप सुरुच

निवासी डॉक्टरांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. काही मागण्यांसाठी मार्डकडून संपाची हाक देण्यात आली होती.

अनेक छोट्या पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, "छोट्या पक्षातील असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे. छोटे कार्यकर्त्ये पक्षात य़ेण्यासाठी मला फोन करतात."

बचत गट आणि सेवा सहकारी संस्था कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

बचत गट आणि सेवा सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. पालिकेने सफाईचं कंत्राट खासगी कंपनीला दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

देवेंद्र फडणवीस खासदार उदयनराजे भोसलेंच्या भेटीसाठी साताऱ्यात दाखल

देवेंद्र फडणवीस खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवास्थानी साताऱ्यात दाखल झाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी केली द्वारकाधीश मंदिरात पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी गुजरातमधील प्रसिद्ध भगवान कृष्ण मंदिर - द्वारकादीश येथे पुजा आणि प्रार्थना केली.

Navi Mumbai News: 'एनएमएमटी'ची उरण बस सेवा बंद; हजारो प्रवाशांना फटका

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव एनएमएमटीची उरण बस सेवा शुक्रवार (ता. २३) पासून अनिश्‍चित काळावधीसाठी बंद करण्यात आली आहे.

जरांगे नक्की कोण आहेत? हे आता लोकांना समजू लागले आहे - मंत्री छगन भुजबळ

जरांगेचा अभ्यास कमी आहे. हे नागरिकांना समजु लागले आहे. जरांगे नक्की कोण आहेत? हे ही समजत आहे. असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Congress MP Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींना प्रियांका गांधींची साथ

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा अलीगडच्या जमलपूरमध्ये आला आहे. यावेळी यात्रेमध्ये राहुल गांधींना प्रियांका गांधी यांना देखील साथ दिली.

Sudarshan Setu: देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुंदर्सन सेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ब्रिजची लांबी २.३२ किलोमीटर इतकी आहे.

पंतप्रधान मोदी आज द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत. ते अनेक प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. त्याआधी ते देवभूमी द्वारका येथे द्वारकाशीश मंदिरात जाऊन दर्शन घेतली.

Mamta Banarjee: ममता बॅनर्जींना दीदी नाही तर आंटी म्हणायला हवं- सुवेंदू अधिकारी

ममता बॅनर्जी यांना आता दीदी म्हणणे योग्य नाही, कारण त्या आता आंटी झाल्या आहेत. त्यांनी माझ्याविरोधात ४२ गुन्हे दाखल केले. त्या क्रूर महिला आहेत, असं भाजप आमदार सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत.

Temperature: नाशिकमध्ये तापमानात अचानक घट; निफाडमध्ये पारा ५ अंश सेल्सियस

नाशिकमध्ये तापमानात अचानक घट झाली आहे. तसेच निफाडमध्ये पारा ५ अंश सेल्सियस इतका गेला आहे. त्यामुळे लोकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत.

Central Railway : मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक

मुंबईकरांनो, आज सकाळी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने तुमच्या लोकल प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेकडून तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Gajanan Maharaj Prakat Din : शेगावात आजपासून संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा, विविध कार्यक्रमांचं आयोजन

बुलढाणा : संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रगट दिन सोहळा आजपासून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ होत आहे. आज महारुद्रस्वाहाकार यज्ञाने या सोहळ्याचा प्रारंभ होत असून त्यानिमित्त मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटकसह राज्यभरातून हजारो दिंड्या या शेगावच्या दिशेने निघाल्या आहेत.

Delhi Farmer Protest : सिंघु-टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्णय

एफआरपीसह विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'ची घोषणा करत दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघु आणि टिकरी या सीमा बंद केल्या होत्या. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी सिंघु आणि टिकरी बॉर्डर अंशत: सुरु करण्याचा दिल्ली निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीपासून दिलासा मिळाला आहे. शेतकरी आंदोलकांनी 29 फेब्रुवारीला होणारा "दिल्ली चलो मार्च" स्थगित केला आहे.

Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरु होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार, २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होणार आहे. 

Donald Trump : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेलेंचा केला पराभव

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी घौडदोड सुरुच ठेवली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार निक्की हेले यांचा साऊथ कॅरोलिनामध्ये पराभव केला आहे. 

Latest Marathi News Live Update
Donald Trump: ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरुच; प्रतिस्पर्धी निक्की हेले यांना साऊथ कॅरोलिनात धक्का

Abdul Malik : उत्तराखंडमधील हल्द्वानी दंगलीचा सूत्रधार अब्दुल मलिक जाळ्यात

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्द्वानी दंगलीचा सूत्रधार अब्दुल मलिक अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. दंगलीनंतर फरार असलेल्या मलिकविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. हल्द्वानी दंगलीप्रकरणी आतापर्यंत ७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मलिक याला दिल्लीत अटक करण्यात आल्याचे उत्तराखंडचे पोलिस महानिरीक्षक नीलेश भारणे यांनी सांगितले. हल्द्वानीमधील बनभूलपुरा येथील बेकायदेशीर मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकावर तसेच पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत आज निर्णायक बैठक

वडीगोद्री (जि. जालना) : षडयंत्र करून डाव यशस्वी होणार नाही. समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. अंतरवाली सराटी येथे आज, रविवारी (ता.२५) समाजाची निर्णायक बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे विषय चर्चिले जातील. षडयंत्राबाबत माहिती समाजबांधवांना दिली जाईल. निर्णयांची अमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे म्हणाले.

Assam : मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा, १९३५ रद्द करण्यास मंजुरी - मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा

Latest Marathi News Live Update : षडयंत्र करून डाव यशस्वी होणार नाही. समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. अंतरवाली सराटी येथे आज, रविवारी (ता.२५) समाजाची निर्णायक बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे विषय चर्चिले जातील, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली. माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घ्यावे, यासाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता. २६) बंद पुकारला आहे. राज्यातील बालविवाहाच्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी आसाम राज्यमंत्रिमंडळाने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा, १९३५ रद्द करण्यास मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा यांनी दिली. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिराला देणगी स्वरूपात आतापर्यंत महिनाभरात जवळपास २५ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. संसदेत मंजुरी देण्यात आलेले तीन फौजदारी कायदे येत्या १ जुलैपासून अमलात येतील,’ अशी माहिती केंद्र सरकारकडून शनिवारी देण्यात आली. ‘हिट अँड रन’च्या घटनांत दोषींना शिक्षा व्हावी म्हणून करण्यात आलेल्या कायदेशीर तरतुदी मात्र तूर्त लागू होणार नाहीत, असेही सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्रात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू आहेत. मराठा आरक्षणावरही वाद-प्रतिवाद सुरु आहेत. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.