22 जानेवारी रोजी भारतीयांना अभूतपूर्व क्षणांचा अनुभव येईल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासंबंधी ते बोलत होते.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
22 जानेवारी निमित्त अयोध्येतील निशाद समूदायाने मोफत बोट सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
संसद सुरक्षा भेद प्रकरणात पटियाला कोर्टाने सहा आरोपींना २७ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह लोकांमध्ये दिसत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये १४ लाख दिव्यांपासून प्रभू रामाचं चित्रण करण्यात आलंय.
राज्यात आज कोविडचे ८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात जेएन.१ व्हेरियंटचे २५० रुग्ण आहेत. १ जानेवारीपासून १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
मुंबईतून उद्या महायुतीच्या मेळाव्यांना सुरूवात होणार आहे. भाजप नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सेना नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्या ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गजानन कीर्तिकर, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे नेते संध्याकाळी ७ वाजता रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. आपचे खासदार राघव चड्डा देखील उपस्थित होते.
मी व्यंग चित्रकाराचा मुलगा आहे , त्यामुळे चित्र कुठले रेखाटायचे ते मला चांगले समजते. मी मोठ्या मनाचा नक्की आहे मात्र तरीही गद्दारांना कधीही पुन्हा संधी देणार नाही. डोंबिवलीची शाखा पळवली मुंबईची शाखा तोडली आपली सत्ता येऊ द्या त्यांचे आता कंबरडेच मोडतो असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत केले.
मार्केट यार्डातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली क्रमांक 11 मध्ये सव्वा चारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. आगीमध्ये चार झोपडय़ा पूर्णपणे जळून खाक झाल्या असून शेजारील आठ झोपडय़ांना आगीची झळ बसली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली मतदार संघाचा आज उद्धव ठाकरेंनी दौरा केला. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता- पुत्रांवर हल्लाबोल केला. कल्याण-डोबिंवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे, असे ते म्हणाले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना EDकडून पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ७ समन्स पाठवूनही चौकशीला का हजर राहिले नाहीत असा सवाल या पत्रामधून विचारण्यात आला आहे. तसेच १६ ते २० जानेवारी दरम्यान उत्तर देण्याच्या आणि चौकशीला हजर राहण्याच्या ED च्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पत्रानंतर आता सोरेन चौकशीला हजर होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
वर्ध्यात प्रथमच वर्धा युथ फेस्ट 2024 च आयोजन सारंग रघाटाटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलं.वर्धेच्या चरखागृहात विविध संस्थांच्या माध्यमातून युथ फेस्टच आयोजन केलंय.या समारोहचा 14 जानेवारी रोजी समारोप होणार आहे.या महोत्सवात युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.सोबतच वर्धाज गॉट टॅलेंट, तसच रिल्स कॉम्पिटिशनचही आयोजन करण्यात आले आहे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने पत्र पाठवलं आहे. आतापर्यंत सात वेळा समन्स पाठवून देखील चौकशीला गैरहजर राहिल्याबद्दल ईडीने त्यांना प्रश्न विचारले आहेत. या पत्राचं १६ ते २० जानेवारीदरम्यान मागितलं आहे. सोबतच, या काळात चौकशीलाही हजर रहावं, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत.
"मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक आज पार पडली. जागावाटपाबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत. पुढील योजना बनवण्यासाठी एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांनंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर आम्ही देशाला पंतप्रधान पदासाठी एक चांगला पर्याय देऊ शकणार आहे"; असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.
नागपूरच्या भोसला मिलिट्री स्कूलचा वार्षिक महोत्सव आज पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. सध्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे याठिकाणी पोहोचले असून, थोड्याच वेळात एअर चीफ मार्शल विनोद चौधरी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावतील.
सीवूड सेक्टर-44 भागात राहणाऱया एका बांधकाम व्यवसायीकाने शनिवारी सकाळी आपल्या कार्यालयात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडुन आपलं जीवन संपवल असल्याची घटना उघडकीस आली आहे.
डोंबिवली लोढा फेस 2 खोणी एस्ट्रेला टॉवरला भीषण आग लागली. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाली. युद्ध पातळीवर आग विजवण्याचं काम सुरू आहे
जगप्रसिद्ध अजिंठा घाटात अपघाताचे व रहदारी विस्कळीत होण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी १० वाजेच्या सुमारास लोखंडी सळई घेऊन घाट उतरणाऱ्या मालट्रक (एमपी. ०९ एचजी २१७०) चे ब्रेक निकामी झाल्याने घाटातच उलटला. त्यामुळे अजिंठा घाटात दिवसभर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 14 जानेवारी ही तारीख मीच सुचवली होती. त्या दिवशी तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून मकर सक्रांत साजरी केली जाते. नामांतराच्या लढयात दलित सवर्णामध्ये निर्माण झालेली दरी मिटावी आणि नामांतराचा विजय दिवस दरवर्षी 14 जानेवारीला तीळगुळाच्या गोडी सारखा बंधुभावाने हर्षोल्हासात साजरा व्हावा. म्हणूनच 14 जानेवारी 1994 रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
पंतगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा धक्का लागल्याने तो ४५ टक्के जळाला. यामध्ये त्याचा उजवा पाय कापावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो मृत्यूशी संघर्ष करीत आहे.
INDIA आघाडीचे संयोजक मल्लिकार्जुन खर्गे बनण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत अनेक नेत्यांनी खर्गे यांनी संयोजक व्हाव अशी भूमिका मांडली चर्चा आहे.
नितीश कुमार यांनी स्वतः संयोजक होण्यास आपण इच्छूक नसल्याचं जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. INDIA आघाडी मजबूत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडीया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत जागावाटपाचा अजेंडा, भारत जोडो न्याय यात्रेतील सहभाग आणि युतीशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेण्यात आला आहे.
विरारमध्ये आजपासून दोन दिवस जागतिक मराठी अकादमी आणि वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शोध मराठी मनाचा २०२४, १९ वे जागतिक मराठी संमेलनस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा दाखल
राज ठाकरे यांनी आज पुण्यात गणेश कला क्रिडामंडळ येथे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांचा मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला यायला उशीर झाला यापेक्षा मी येऊच शकत नव्हतो, काल रात्री पासून अशक्तपणा आला आहे. सकाळी माझे डोळे उघडत नव्हते. तुम्ही सगळे आला आहात म्हणून मी पाच १० मिनिटे बोलणार आहे.
पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात तीन साधूंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ जणांना हजर करण्यात आले.
पुरुलिया जिल्ह्यात साधूंच्या एका गटावर जमावाने हल्ला केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर पोलीस अधिक्षक अविजित बॅनर्जी म्हणाले, "तीन संत एका वाहनातून जात होते... गौरांगडीहजवळ, तीन मुली एका लोकलकडे जात होत्या. गाडी त्यांच्या जवळ थांबली आणि साधूंनी त्यांना काहीतरी विचारले.. काही भाषेच्या प्रश्नामुळे काही गैरसमज झाले आणि मुलींना वाटले की साधू त्यांच्या मागे लागले आहेत. स्थानिक लोक आले आणि साधूंना दुर्गा मंदिराजवळ घेऊन गेले. आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली.. साधूंनाही मारहाण करण्यात आली... पोलिसांनी साधूंना सर्वतोपरी सहकार्य केले... साधूंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे."
पुण्यात पाषाण येथील बालाजी मंदिर चौक परिसरात सुरू असलेल्या मटका अड्डा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी धाड टाकून कारवाई करण्याची मागणी करत बंद केला.
पाषाण येथील बालाजी मंदिर चौक परिसरात राजरोसपणे मटका व पाकळी खेळाचा अवैध धंदा सुरू होता. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांना फोन केला.
दरम्यान माजी आमदार मेधा कुलकर्णी व त्यांचे कार्यकर्ते आल्यामुळे मटका अड्ड्यावरील मटका चालक व खेळणारे यांची धावपळ उडाली व तिथून त्यांनी पळ काढला.पोलिसांनी मटका अड्ड्यावरील रोख रक्कम, चिठ्ठी चे कागद तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले.
आज पुण्यात मनसेचा मेळावा आहे. या मेळाव्यात राज ठाकरे संबोधित करणात आहे. यापूर्वी मनसे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १५ ते २० जागा लढवणार, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Vasant More NCP: राज ठाकरे आज पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. यावेळी वसंत मोरे लोकसभेसाठी आपला दावा मजबूत करणार आहेत.
MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात मेळावा घेतला जाणार आहे. गणेश मंदिरात राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करतील.
ED Summoned Kejriwal:ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी त्यांनी चौकशीला दांडी मारली होती.
Bharat Gogavale: भरत गोगावलेंविरोधात ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाडच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे.
Sharad Mohol Case 3 Arrested: शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Prabha Atre Passed Away: जेष्ठ गायिका प्रभा यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं.
Uddhav Thackrey: नुकतीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की, 'नुकतच अटल सेतूचं उद्घाटन झालं, तिथं एकाही ठिकाणी अटलजींचा फोटो नव्हता. राम मंदिरात रामाचीच मुर्ती लावा. '
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात 18 जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या नंतर तरी केजरीवाल ईडीसमोर हजर होणार की नाही हे पाहावे लागणार आहे.
दिल्लीत धुक्यात कमी दृश्यमानतेमुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक फ्लाइट्स उशीराने पोहचल्याचल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू राष्ट्राला समर्पित केला. 'अटल सेतू' आजपासून सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे
मनसे अध्यक्ष राज ठकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील गणेश कला क्रिडा मंच येथे आज मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
तेलंगणातील एररावल्ली गावाजवळ एका खासगी बसला आग लागून एक ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना कर्नूल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाराष्ट्र : नागपुरातील सिव्हिल इंजिनिअर प्रफुल्ल माटेगावकर यांनी अयोध्येतील राम मंदिराची ११ फुटांची प्रतिकृती त्यांच्या घरी बनवली आहे. या त्यांच्या कलाकारीचं कौतुक होताना दिसत आहे.
चिक्कोडी, मांजरी : राष्ट्रीय पक्षी असलेले तब्बल ११ मोर (Peacock) मृत होऊन पडल्याची घटना मांजरी (ता. चिक्कोडी) येथे कृष्णा काठावर शुक्रवारी (ता. १२) उघडकीस आली. याची वनखात्याच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं सुरुवातीचं ठिकाण बदललं असून मणिपूरमधील इंफाळ ऐवजी ही यात्रा थौबुल मधून सुरू होणार आहे. पोलिस प्रशासनाने यात्रेसाठी फक्त 1 हजार लोकांना परवानगी दिली होती. मात्र, यात्रेला जास्त लोक येणार असल्याने ठिकाण बदलण्याचा काँग्रेसनं निर्णय घेतला आहे. इंफाळपासून 34 किमी दूर असलेल्या थौबुल या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृत्यू झालेले लोक महाजनवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे. मराठा महासंघ, जाट महापंचायत आणि गुज्जर समाज यांची दिल्लीत बैठक होत आहे. देशातील आरक्षणापासून वंचित असलेल्या छोट्या-छोट्या समाजाला सोबत घेत आगामी काळात आंदोलन केलं जाणार आहे. आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी आहे. आज होणाऱ्या बैठकीत आगामी काळातील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. बैठकीला राज्यातील मराठा महासंघाचे नेते उपस्थित राहणार असून शेतकरी नेते राकेश टीकैत देखील उपस्थित राहणार असल्याची आयोजकांची माहिती आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच, अटल सेतू आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. देशातील सर्वात लांब सागरी सेतूमुळे मुंबई शहर आणि पनवेल, तसेच नवी मुंबईमधील अंतर कमी होणार आहे. याआधी या प्रवासाला तब्बल एक ते दीड तास लागायचा तो प्रवास केवळ वीस मिनिटांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाचं लोकार्पण केलं असून आज सकाळी आठ वाजल्यापासून हा पूल प्रवासासाठी खुला होणार आहे.
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. जागावाटप, निमंत्रकाच्या नावावर चर्चा होण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्र : मुंबई गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्यातील कासा परिसरातून 12 कोटी रुपयांचा तंबाखू जप्त केला असून 7 जणांना अटक केलीये. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिटचे दया नायक यांनी दिली.
अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र, सोहळ्याला काही महंतांनी विरोध दर्शविला आणि या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीएन मठाच्या शंकराचार्यांनीही 40 दिवसांच्या उपासनेची घोषणा केलीये.
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या 10 राज्यांमध्ये राम मंदिर सोहळ्याचे 40 मोठे होर्डिंग्स झळकले आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूँच येथे काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. जवानांनी तातडीने गोळीबाराने प्रत्युत्तर दिल्याने दहशतवादी पळून गेले. यावेळी झालेल्या चकमकीत कोणीही जखमी अथवा मृत झाल्याचे वृत्त नाही. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कृष्णाघाटी सेक्टरमधून लष्कराच्या वाहनांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने त्याबाबत धोरण ठरविण्यासाठी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ अधिकारी पूँचमध्येच असताना हा हल्ला झाला.
Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्याला ३० हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट देतानाच आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचीही पायाभरणी केली. नाशिकमध्ये रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधत त्यांनी मुंबईमध्ये विकासप्रकल्पांच्या उद्घाटनाचा बार उडवून दिला. या निमित्ताने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या महायुतीतील घटक पक्षांनी एकीचे दर्शन घडविले.
जम्मू-काश्मीरमधील पूँच येथे काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. जवानांनी तातडीने गोळीबाराने प्रत्युत्तर दिल्याने दहशतवादी पळून गेले. यावेळी झालेल्या चकमकीत कोणीही जखमी अथवा मृत झाल्याचे वृत्त नाही. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कालपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याचबरोबर देशातील वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. देशभरात पुन्हा कोरोना विषाणूने थैमान माजवल्याचे चित्र आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.