Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal
Updated on

मंगला एक्स्प्रेसमध्ये सहा संशयित बॅग सापडल्या

मंगला एक्स्प्रेसमध्ये सहा संशयित बॅग सापडल्या असून रत्नागिरी स्थानकात ट्रेन थांबवण्यात आलेली आहे.

प्रकाश आंबेडकर ३० तारखेच्या बैठकीला उपस्थित राहतील- पटोले

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे येत्या ३० तारखेच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवला आहे.

तीन नवीन जीआर घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

मराठा आरक्षणासंबंधी तीन नवीन जीआर घेऊन राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

Nana Patole New: नाना पटोलेंची महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना दुसऱ्यांदा लिहिलं पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना दिवसात दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. गैरसमज दूर झाले असतील, असं म्हणत ३० जानेवारीच्या बैठकीला येण्याची विनंती त्यांनी केलीये.

Manoj Jarange Patil News: सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी रवाना

सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी लोणावळ्याकडे रवाना झाले आहे. जरांगे हे लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे मध्ये कुठेतरी त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Gallantry awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शौर्य पुरस्कारांची घोषणा

French President Emmanuel Macron hold roadshow: फ्रान्सचे अध्यक्ष आणि PM मोदींचा राजस्थानच्या जयपूरमध्ये रोडशो

प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रो हे भारतात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला पंतप्रधान मोदी आणि मॅक्रो यांनी राजस्थानच्या जयपूरमध्ये रोडशो केला.

Sanjay Raut: महाविकास आघाडीची मुंबईतील बैठक संपली

मुंबईतील महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. यावेळी आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकरांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे, असं राऊत म्हणाले.

Manoj Jarange News: मार्ग बदलण्याची नवी मुंबई पोलिसांची विनंती जरांगेकडून मान्य

नवी मुंबईत येताना १० किलोमीटरचा मार्ग बदलण्याचा नवी मुंबई पोलिसांची विनंती जरांगे पाटील यांनी मान्य केली आहे. जरांगे लोणावळ्यातून निघाले असून ते तुर्भे एफएमसी येथे रात्री उशीरापर्यंत पोहोचतील.

सांताक्रूझ पश्चिममध्ये मोठी आग; इमारतीच्या बेसमेंटमध्ये घडली दुर्घटना

सांताक्रूझ पश्चिममध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. धीरज हेरिटेज या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी ६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पुलवामात संशयास्पद वस्तू आढळली, सुरक्षा रक्षकांनी केली उद्ध्वस्त

नवी मुंबई पोलिसांची जरांगेंना मार्ग बदलण्याची विनंती

मनोज जरांगे यांनी लोणावळ्यातून मुंबईकडं कूच केली असून वाटेत नवी मुंबई पोलिसांनी त्यांना मोर्चाचा १० किमी पर्यंतचा मार्ग बदलण्याची विनंती केली आहे. पण जरांगेंनी त्यांच्या विनंतीला धुडकाऊन लावत पुढे जाण्याचा निश्चित बोलून दाखवला.

प्रजासत्ताक पूर्वसंध्येला अटारी बॉर्डरवर 'बिटिंग द रिट्रिट' सोहळा

आळेफाटा इथं अजितदादांचा ताफा अडवला; दाखवले काळे झेंडे

आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी आळेफाटा इथं अजित पवारांचा ताफा अडवल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन-तीन आंदोलकांनी ताफा अडवून त्यांना निषेधाचे काळे झेंडेही दाखवले.

जरांगेंच्या नोटिशीविरोधात आयोजक विरेंद्र पवारांची कोर्टात धाव

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. याची रितसर नोटीस पोलिसांनी जरांगेंना दिली. पण आता या नोटिशीविरोधात जरांगेंच्या आझाद मैदानातील आयोजक विरेंदर पवार यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

Maratha Andolan: आझाद मैदानावर जरांगे पाटील आंदोलन करण्यास ठाम

मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली असली तरी मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहेत. आमचं व्यासपीठ उभं राहिलं असून मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

Maratha Andolan : जरांगे पाटील मुंबईकडे रवाना 

 मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठ्यांसह थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जाण्यावर ठाम आहेत.

PM Narendra Modi: देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे आपल्याला जायचे आहे: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी (२५ जानेवारी) उत्तर प्रदेशातील बुलंदशहरला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. याआधी स्थानिक नेत्यांनी त्यांना मंचावर रामाची मूर्ती भेट दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल आनंदी पटेल यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे आपल्याला जायचे आहे

आम्हाला पण आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे - मनोज जरांगे पाटील

आम्हाला पण आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे. आम्ही मुंबईत मज्जा करायला जात नाही आहोत. सरकारला आम्ही सहकार्य करणार मात्र मुंबईत जायला ठाम आहोत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Andolan : आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगे पाटील ठाम

आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला आरक्षण हवेच आहे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Andolan : मुंबई पोलिसांनी नाकारली आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाची परवानगी

मुंबई पोलिसांनी जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान येथे ते आंदोलन करणार होते.

Army News:लष्कराला मिळणार नवीन बुलंद तोफा! ३०७ हॉवित्झरची देण्यात आली ऑर्डर

चीन आणि पाकिस्तान सीमा रक्षणासाठी 307 हॉवित्झर आर्टिलरी गन सिस्टिम (एटीजीएस) ची पहिली ऑर्डर ३१ मार्चच्या आधी देण्यात येईल असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनी सांगितले

Devendra Fadnavis on INDIA Alliance:इंडिया आघाडी ही आघाडी नाहीच- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इंडिया आघाडी ही आघाडी नाहीच. इथे प्रत्येक जण वेगळा लढतोय. "

Pune Police Raid: बाणेरमधील हॉटेलात पोलीस धडकले, १५ मुलींची सुटका

Online Sex Racket in Pune:व्हॉट्सअपद्वारे (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडून मिळालेल्या एजंटच्या क्रमांकावरून सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. बाणेरमधील दोन बड्या हॉटेलवर मध्यरात्री छापेमारी करत ११ मुलींची सुटका करण्यात आली असून एक नवी मुंबईची तर इतर परराज्यातील मुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Manoj Jarange Notice:मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस,नेमकं कारण काय ? 

Mumbai Police Notice to Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे. आझाद मैदानाची क्षमता ५००० आंदोलकांची आहे. त्यापेक्षा अधिक आंदोलक मुंबईत येऊ शकत नाहीत, असे या नोटीशीत सांगण्यात आलं आहे.

Manoj Jarange towards Mumbai:जो विघ्नसंतोषी दिसेल त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या- मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगेंची पदयात्रा सध्या लोणावळा याठिकाणी दाखल झाली आहे. यावेळी समाजासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजाला सूचनाही केल्या. ते म्हणाले की, "यात्रेत कुणी विघ्नसंतोषी दिसला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या."

Manoj Jarange towards Mumbai:आपण शिस्त मोडायची नाही- मनोज जरांगे

Manoj Jarange on Maratha Reservation: मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा सध्या लोणावळा या ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या समाजाला शिस्त न मोडण्याचे आवाहन केले.

Manoj Jarange Lonawala: समाजाला सांगतो मुंबईकडे तोंड करुन थांबा- मनोज जरांगे

Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगे यांची आरक्षण पदयात्रा नवी मुंबईमध्ये दाखल होणार. यावेळी मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव आज मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपणार आहे. संध्याकाळी लोणावळा येथून मराठा आरक्षण पदयात्रेचा नवी मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे. भगवं वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. यासाठी सरकारचे प्रतिनिधी लोणावळ्यात दाखल झाले आहे.

NCP MLA  Disqualification : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज विधान भवनात सुनावनी होणार आहे. काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हेंची साक्ष नोंदवण्यात आली. आज अजित पवार गटाचे सुनील तटकरे व मंत्री अनिल पाटील यांची उलटसाक्ष नोंदवली जाणार आहे.

Uddhav Thackeray : पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर

पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाकडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. पदाधिकारी भेटी आणि जाहीर सभेचे देखील आयोजन दौऱ्यादरम्यान करण्यात येणार आहे.

Nagpur News : अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अंगणवाडी सेविकांचा आंदोलनाचा इशारा; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आज अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंगणवाडी सेवकांचे मागील 51 दिवसापासून आंदोलन सुरू असताना सरकार त्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे आज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तब्बल 200 पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले असून यामध्ये 100 महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

Maratha Reservation : लोणावळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या एन्ट्री-एक्झिटवर कडक सुरक्षाव्यवस्था

लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. रॅपिड अॅक्शन फोर्स आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहे. मराठा आरक्षण समर्थकांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जायचे होते, परंतु पोलिसांनी त्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे.

Ayodhya Ram Mandir : पुण्याच्या ढोल पथकाचं अयोध्येत सादरीकरण

पुणे येथील भाविकांनी अयोध्येतील हनुमान गढीसमोर ढोल, शंख आणि इतर वाद्य वाजवून सादरीकरण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे जाण्याचा पोलिसांनी मार्ग बदलला

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.

मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.

Accident News: अमरावती तळेगाव दशासर भीषण अपघात

चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.

Weather Update: नागपुरात थंडीचा जोर वाढला, आज 8.7 अंश तापमानाची नोंद

नागपुरात थंडीचा जोर वाढला असून आज 8.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज अचानक तापमानाचा पारा 5.9 अंशानी तापमानाचा पार घसराला आहे.

MVA Meeting: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

‘इंडिया’ आघाडीतून आज पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमधून आपने बाहेर पडून लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता.२५) राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावर मुंबईत बैठक होणार आहे.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होणार असून अद्यापही आघाडीमध्ये १५ जागांवर एकमत होऊ शकलेले नसल्याने त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला जाणार आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे स्थानिक पक्षांसोबत सूर जुळले नसले तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीमध्ये तुर्तास सूर बिनसलेले नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असल्याने ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे जात नव्हती, आता मात्र आघाडीच्या जागा वाटप चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.

ACB Raid : तेलंगणातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा, एसीबीच्या हाती लागला मोठा खजिना

तेलंगणातील एका अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला बुधवारी मोठा खजिना मिळाला. तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट मॅनेजमेंट अथॉरिटी (TSRERA) चे सचिव शिवा बालकृष्ण यांच्याकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं वृत्त आहे. गुरुवारीही तपास सुरू राहण्याची शक्यता आहे.

रामलल्लाच्या दर्शनासाठी तिसऱ्या दिवशीही भाविकांची राममंदिरात मोठी गर्दी

अयोध्या, उत्तर प्रदेश: प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर म्हणजे काल (बुधवार) तिसऱ्या दिवशी श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी राम मंदिरात मोठी गर्दी केली होती.

Mandhardev Kaleshwari Devi : मांढरदेवमध्ये काळेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात

वाई : महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झाला. आज पौष पौर्णिमेला (ता. २५) यात्रेचा मुख्य दिवस आहे.

Marathi News LIVE Updates
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव-काळेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात; गडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Marry Kom : ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमने बॉक्सिंगमधून घेतली निवृत्ती

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेरी कोमने स्वतः निवृत्तीची घोषणा केली आहे. मेरी कोम 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे. 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने पदक जिंकले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेरी कोम 41 वर्षांची आहे.

Marathi News LIVE Updates
Mary Kom Retirement : 'मी निवृत्ती घेतलीच नाही..', बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा!

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लवकरच मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. लवकरच मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा बांधवांची गर्दी पाहता आज सव्वा सातच्या दरम्यान मराठा मोर्चा लोणावळ्यात पोहचणार आहे.

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना अटक होणार; मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक केली जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे एका कार्यक्रमादरम्यान सरमा म्हणाले की, आम्ही एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना (राहुल) अटक केली जाईल. आम्ही निवडणूक जिंकणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनात तोडगा काढू - मुख्यमंत्री शिंदे

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला पहिला तडा गेला असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राज्यात लोकसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तसेच मराठा आंदोलनाचे लोण मुंबईच्या दिशेने सरकू लागल्याने राज्य सरकार सावध झाले आहे. ‘मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनामध्ये तोडगा काढू, आरक्षणातील त्रुटी दूर करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोग करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेय. तर, जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरल्याने मध्य महाराष्ट्र गारठला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रात्री सव्वा दहा वाजता ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. ते ED च्या चौकशीनंतर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी राममंदिर खुले करण्यात आले आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.