शरद पवार गटाने उद्या 4 वाजेपर्यंत जर नाव आणि चिन्ह दिली नाहीत तर शरद पवार गटाला अपक्ष मान्यता दिली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. "केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते…. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!"
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह व पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या निर्णयाचे बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी स्वागत केले. बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
अजित पवार यांच्याकडे आमदारांसह कार्यकर्त्यांचे बहुमत असल्याने हा निर्णय अपेक्षितच होता, अशी प्रतिक्रीया प्रमुख पदाधिका-यांनी व्यक्त केली.
अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. याबाबत 'निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे', अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवारांनी दिला आहे.
विश्रांतवाडी : पोलिसांच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना विश्रांतवाडी येथील मेंटल कॉर्नर चौकाजवळ घड़ली. या अपघातात गजानन रत्नाकर शिंदे (वय 77, रा. श्रीराम अपार्टमेंट, पोरवाल पार्क, शांतीनगर, येरवडा, पुणे) हे जखमी झाले असून याप्रकरणी पोलीस गाडीच्या चालकाविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शिंदे हे मेंटल कॉर्नर येथून सायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या पोलिसांच्या चारचाकी वाहनाची धडक बसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. पु्णे ग्रामीण पोलिसांच्या गाडीमुळे रविवारी हा अपघात घडला असल्याचे समजते. अपघातातील जखमी ज्येष्ठ नागरिक गजानन शिंदे यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सुधा चौधरी करीत आहेत.
सय्यद मोहसिन रझा नक्वी यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
ICICI बँक आणि व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी चंदा आणि दीपक कोचर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये दिलेला अंतरिम जामीन हायकोर्टानं नियमित केला आहे. CBI नं याप्रकरणी गुन्हा दाखल करत कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांनाही अटक केली होती. हायकोर्टानं चंदा आणि दीपक कोचर यांची अटक बेकायदा ठरवून अंतिरम जामीन त्यांना मंजूर केला होता.
अहमदनगर-मनमाड महामार्गावरील सावेडी परिसरातील एका कॉम्प्लेक्सला आग लागली, अग्निशमन अधिकारी मेसळ यांनी सांगितलं की, "अहमदनगर-मनमाड महामार्गावरील सावेडी परिसरातील साई मिडास टच कॉम्प्लेक्सला आग लागल्याची माहिती मिळाली. सकाळी 9.30 वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आग आता नियंत्रणात आली आहे."
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिमडेगा, झारखंड येथून त्यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू केली.
अहमदनगर-मनमाड महामार्गावरील सावेडी परिसरातील एका कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोंढवा, ता. ६ : महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील मॅजिस्टीक युरीस्का या अकरा मजली इमारतीत शेवटच्या मजल्यावरील एका सदनिकेला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. कोंढवा अग्निशामक दलाने वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. एचएमने त्यांना भारतरत्न जाहीर केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह लैंगिक छळ प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात दाखल झाले.
हरदाचे जिल्हाधिकारी, ऋषी गर्ग म्हणाले, "फटाका बनवण्याच्या कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला. बचाव कार्य सुरू आहे. सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर 59 जण जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि गंभीर जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भोपाळ आणि इंदूरला हलवले.
पुणे शहरातील मोहम्मदी परिसरात दिल्ली पब्लिक स्कूलजवळील 11 मजली इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी आहेत. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे, पुणे अग्निशमन विभागाने ही माहिती दिली.
मुंबईतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी आग लागली आहे. आत्तापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. असे वृत्त समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर ६.५ षटकांत विजय मिळवला आहे. वन डे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रियंका कक्कर यांनी दावा केला आहे की, ईडीने मारलेल्या छाप्यांमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना एक पैसाही" वसूल केला नाही.
कांदिवली पूर्व, मुंबईतील अशोक नगर येथील एका शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर आत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पैठण माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.
महायुती सरकार साडी घोटाळा करत आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले कि, सरकार १ कोटी महीलांना साडी वाटणार आहे. हा एक प्रकारचा घोटाळा आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे जखमी झाले आहेत. मंगळवारी कल्याण पूर्वेत महेश यांच्या समर्थकांनी बॅनर बाजी करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांची प्रकृती नीट व्हावी यासाठी महामृत्युंजय जप व रुद्र अभिषेक करण्यात येत आहे.
ऐन फेब्रुवारीत मराठवाड्यावर पाणी संकटाचं सावट घोंगावतं आहे. फेब्रुवारीत मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना २५६ टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
उजणी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी अजित पवार यांच्याकडून धुडकावून लावण्यात आली.
उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मांडण्यास सुरुवात झाली आहे.
कोल्हापुर शहरात गुंडांची दहशत बघायला मिळत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर येत आहे.
अहमदनगरमधील मिडास कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत.
कल्याणमध्ये झळकलेल्या बॅनर्समधून महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
नागपुरात दुपारपासून सुरु असलेलं गोंड आणि गोवारी समाजाचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्यास १२ तारखेला पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
'वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांच्या बैठका होतात.' असा घणाघातील आरोप संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पर्सनल सेक्रेटरीच्या घरासह इतर जवळपास १० ठिकाणी ईडीकडून शोध घेतला जात आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या लोकांची सध्या चौकशी सुरू आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग २४ तास बंद राहणार आहे. या मार्गावर वेगाने काम सुरू असून लवकरच हा रस्ता सुरू होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आज राज्य विधानसभेत समान नागरी संहिता उत्तराखंड 2024 विधेयक सादर करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत जम्मू आणि काश्मीर स्थानिक संस्था कायदे (सुधारणा) विधेयक, 2024, जम्मू आणि काश्मीर पंचायती राज (सुधारणा) कायदा, 1989 (IX ऑफ 1989) , जम्मू आणि काश्मीर महापालिका कायदा, 2000 (XX ऑफ 2000) आणि जम्मू आणि काश्मीर महानगरपालिका अधिनियम, 2000 ( XXI ऑफ 2000) सादर करणार आहेत.
राज्यासह देशात सध्या सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहे. यासोबतच सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा देखील सुरू आहे. देशातील राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि मनोरंजनासंबंधी सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.