News Update: रिलायन्सच्या देशभरातील कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला सुट्टी

Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal
Updated on

रिलायन्सच्या देशभरातील कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला सुट्टी 

"ED, CBI, IT या संस्था NDA चा भाग" - आदित्य ठाकरे

खासदार विनायक राऊत राजन साळवींच्या भेटीला

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर एसीबीकडून गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांची भेट घेतली आहे.

रोहित पवारांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विनंती; म्हणाले...

ED च्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन, मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच EDला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ही विनंती मान्य करेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अयोध्येतील सोहळ्यादिनी जामिया इस्लामिया विद्यापीठात असणार हाफडे

जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी- प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय मैदानात उतरून लोकसभा निवडणूक लढविले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

राम रहीम पन्नास दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर येणार आहे

राम रहीम तब्बल नवव्यांदा पॅरोलवर बाहेर येणार आहे. यावेळी तो पन्नास दिवसांसाठी बाहेर येणार आहे.

राज्य सरकारकडून प्राणप्रतिष्ठेसाठी सरकारी सुट्टी जाहीर- सूत्र

आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती असून राज्य सरकारकडून सरकारी सुट्टी जाहीर करण्यातचंही कळतंय.

खोके सरकार अत्यंत क्रूरपणे वागत आहे- आदित्य ठाकरे

'जनता अदालत'नंतर खोके सरकार क्रूरपणे वागते आहे. लगेच सूरज चव्हाण यांना अटक झाली. मात्र त्यांच्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

माजी महापौर किशोरी  पेडणेकरांना ईडीचे समन्स

कोरोना काळतील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. गुरूवारी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स

बारामती अ‍ॅग्रो कारखाना प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहेत. या प्रकरणी आता ईडीने बुधवारी आमदार रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावले आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

तरूणांच्या हाताला रोजगार नाही - शरद पवार

तरूणांच्या हाताला रोजगार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी सोलापूरमध्ये केले आहे.

डीआरडीओ मेटकाफ हाऊस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

दिल्ली : डीआरडीओ मेटकाफ हाऊस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. आतापर्यंत कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या 18 बंबांनी आग आटोक्यात आणली. कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहेत.

CM Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच्या व्यवस्थेची केली पाहणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील शरयू घाटाला भेट दिली आणि 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच्या व्यवस्थेची पाहणी केली.

Maratha Reservation: जरांगे पाटलांनी आंदोलन टाळावं ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

जरांगे पाटलांनी आंदोलन टाळावं असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावेळी टिकणारे मराठा आरक्षण सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी दिला जय श्रीरामचा नारा 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर भारतीयांसमोर जय श्रीराम चा नारा दिला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला.

Manoj Jarange Patil: रोहन पाटील साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका रोहन पाटील साकारत आहेत.

Yavatmal News : दोन काश्‍मिरी तरुणांना पांढरकवडानजिक अटक यवतमाळ  

जम्मू काश्मीरमधील दोन संशयित अतिरेकी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून प्रवास करीत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेच्या (आयबी) अधिकाऱ्‍यांकडून मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून तेलंगणात जाणारा एक ट्रक अडवला. पोलिस दिसताच त्यातील दोन संशयित तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Maratha Reservation: उपोषण सोडवायला आलेले मंत्री आता कुठे आहेत? - मनोज जरांगे पाटील 

उपोषण सोडवायला आलेले मंत्री आता कुठे आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील  यांनी आज विचारला. यावेळी मुख्यामंत्र्यांनी आणि दोन्ही उप मुख्यामंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे असे म्हणाले

PM Modi: मोठी स्वप्न बघा लहान स्वप्न पाहू नका - पंतप्रधान मोदी

सोलापूरमध्ये मोदी म्हणाले की, गरिबांचं कल्याण करणं जा आमचा मार्ग आहे. तुम्ही मोठी-मोठी स्वप्न बघा छोटी स्वप्न बघू नका. तुमचं स्वप्न पूर्ण कारणं हे माझं काम आहे. ही मोदींची गॅरंटी आहे.

गेल्या 10 वर्षांत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 30 लाख कोटी रुपये जमा -  पंतप्रधान मोदी

गेल्या 10 वर्षांत, सरकारने थेट हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 30 लाख कोटी रुपये जमा केले आहेत: पंतप्रधान मोदी

PM Modi In Solapur : PM मोदींच्या हस्ते अमृत २.० योजनेचा शुभारंभ तसेच देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकर्पण संपन्न

सोलापुरात अमृत २.० योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रे नगर येतळी गृहप्रकल्पातील काही लाभार्थांना मोदींच्या हस्ते घरांची किल्ली सोपवणय्ता आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत. तसचे स्वनिधी योजनेतील काही लाभार्थ्यांना निधी देखील यावेळी सोपवण्यात आला.

PM Modi In Solapur : दावोसमध्ये अनेक  देशांचे प्रमुख भेटले, सर्वांच्या तोंडी मोदींंचं नाव - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यावेळी अनेक देशांचे प्रमुख नेते भेटले त्या सर्वांच्या तोंडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव होतं अशी माहिती दिली. मोदींच्या हाती यश आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हण मोदींसाठी लागू होते असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

PM Modi In Solapur : सोलापूरात PM मोदींसमोर आडम मास्तरांकडून उद्धव ठाकरेंचा 'मुख्यमंत्री' असा उल्लेख

पंतप्रधान मोदी यांच्या समोर माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी चुकून उप मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा नावाचा उल्लेख केल्याचा प्रकार समोर आला. पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

Nashik Accident : मनमाड - मालेगाव रस्त्यावर अपघात; एक ठार, ७ ते ८ जण जखमी

मनमाड - मालेगाव मार्गावर चोंढी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला आहे तर बसमधील ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत. घटना आज सकाळच्या सुमारास घडली. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

PM Modi In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधानांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.

नागपूरमधील प्रसिद्ध साई मंदिराला अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण

नागपूर - वर्धा मार्गावरील प्रसिद्ध साई मंदिराला अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या मंदिर समितीने श्रीराम मंदिर उभारणीच्या कामाला हातभार लागावा म्हणून 3 वर्षांपूर्वी 25 लाख रुपयांचा दिला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक राजेश लोहया यांनी साई मंदिर समितीचे सचिव अविनाश शेगावकर यांना निमंत्रण पत्रिका दिली. नागपुरातील साई मंदिर भाविकांच श्रद्धास्थान आहे.

Ajit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमीत्त उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमीत्त उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमीत्त आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोलापुरात असणार आहेत.

Mumbai Local: कसाराकडे जाणारी रेल्वे सेवा १ तासांपासून विस्कळीत

कसाराकडे जाणारी रेल्वे सेवा १ तासांपासून विस्कळीत झाली आहे. आसनगाव-अटगाव दरम्यान दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात दाखल झाले आहेत.

Sharad Pawar: कृषी महोत्सवासाठी शरद पवार आज सांगोल्यात

माजी कृषिमंत्री शरद पवार आज (शुक्रवारी ता. १९) सांगोल्यात येणार आहेत. स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ’गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४’च्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.

गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव १९ ते २२ जानेवारीदरम्यान सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संपन्न होणार आहे. या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री शरद पवार भूषविणार आहेत तर शेकाप पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन होणार आहे.

Narendra Modi visit Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होतील. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बंगळुरुकडं रवाना होतील.

Thane Municipal Corporation : ठाण्यातील घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग, एकाचा मृत्यू

ठाण्यातील घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच, अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हटवला आहे. 3 तासांच्या प्रयत्नानंतर तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा पहिला फोटो प्रसिद्ध

अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो नुकताच प्रसिद्ध झाला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे.

Marathi News LIVE Updates
Ayodhya Ram Mandir : गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावर चारचाकी वाहनांचा ताबा सुटून अपघात

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली बायपास महामार्गावर चारचाकी वाहनांचा ताबा सुटून अपघात झाल्याची घटना घडली. या चारचाकी वाहनांची धडक रस्त्यालगत असलेल्या शेडला देऊन पुढे लावलेल्या टेम्पोला धडक झाली. यात चारचाकी वाहनांचे व टेम्पोचे मोठे नुकसान झाले. हे चारचाकी वाहन नांदेड येथील आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली नव्हती.

Shivendraraje Bhosale : आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह ४८ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

सातारा : आनेवाडी टोलनाक्याच्या वादावरून झालेल्या गोंधळादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

D. Y. Chandrachud : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना अयोध्या राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यासाठी 22 जानेवारीला सर्व न्यायालयांमध्ये न्यायालयीन सुट्टी देण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, मेईतेई समुदायाच्या 5 जणांची गोळ्या झाडून हत्या

मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना निंगथौखॉन्ग खा खुनौ येथे घडली. पीडितांमध्ये एक व्यक्ती आणि त्याचे 60 वर्षीय वडिलांचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या चौघांसह बुधवारपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दोन पोलीस कमांडोसह किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Maratha Reservation : 20 जानेवारीला पुढील आंदोलनासाठी मुंबईला जायचंच - मनोज जरांगे

Latest Marathi News Live Update : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासनाला सात महिन्यांचा वेळ दिला. त्यात काही निर्णय झाला नाही, आरक्षण मिळाले नाही. सरकारकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. 20 जानेवारीला पुढील आंदोलनासाठी मुंबईला जायचे आहे. त्यासाठी समाजबांधवांनी तयार राहावे,’’ असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. यावर आता सरकार काय तोडगा काढतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात संक्रांतीनंतर किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवेतील गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवस हा गारठा कायम राहील, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यामध्ये विनायक पाटील राज्यात पहिला आला आहे. अयोध्येत येत्या सोमवारी (ता. २२) होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभर जोरदार तयारी सुरू असतानाच केंद्र सरकारनेही देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.