Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal
Updated on

जागावाटपात लवकरच मार्ग सापडेल- अनुराग ठाकूर

जागावाटपाच्या सर्व समीकरणांवर चर्चा सुरु आहे. त्यात लवकरच योग्य मार्ग सापडेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजपची बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते.

रश्मी शुक्ला यांनी घेतला संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला हेडगेवार स्मृती भवन मंदिरासह संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्ला यांच्या संघ मुख्यालय सुरक्षेच्या आढाव्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. यावेळी नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या दिल्लीतील बैठकीसाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दाखल

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हे भाजपच्या बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात लोकसभा जागा वाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

अनंत अंबानी अन् राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी मार्क झुकेरबर्ग जामनगरला

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग जामनगरला आले आहेत.

दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीत भाजपची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागांच्या वाटपासंदर्भात भाजपची दिल्लीत बैठक सुरु आहे.

मराठी भाषा दिनाचा अमेरिकेतील शिकागोत गौरव

मराठी भाषा दिना निमित मराठी भाषा आणि तिचा गौरव अमेरिकेतील शिकागो येथे करण्यात आला. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या ‘साहित्य कट्टा’च्या आयोजकांनी मराठी भाषा गौरव दिन एका आगळ्या आणि वेगळ्या प्रकारे साजरा केला. 

टीएमसीचे नेते शेख शाहजहान यांना अटक!

टीएमसीचे नेते शेख शाहजहान यांना अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीच असे म्हटले होते गुन्हेगार असणाऱ्याला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही.

शासकीय पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही, वादाला सुरुवात होणार?

२ मार्चला बारामतीत नमो रोजगार मेळावा पार पडणार असून त्यात शरद पवारांचे नाव नसल्यानं वेगळ्याच वादाला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शरद पवारांनी फोन करून गोविंद बागेत जेवायला येण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती आहे.

दहा वर्षांपासून कित्येक मौल्यवान वस्तू पुन्हा भारतात आल्या! - निर्मला सीतारामन

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सीमाशुल्क/रेव्हेन्यू इंटेलिजन्स संचालनालयाने जप्त केलेल्या पुरातन विविध वस्तू हस्तांतरण करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. त्या म्हणाल्या, "...गेल्या दहा वर्षांत, आमच्याकडे विविध देशांतील मौल्यवान नाणी आहेत. किंवा प्राचीन वस्तू आणि अशा अनेक गोष्टी आपल्या देशात परत आल्या आहेत...."

Uday Samant: मुंबईतील बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्हव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार; उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबईतील किनारी (कोस्टल ) मार्गाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्हव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

PM Surya Ghar Yojana 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी; एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज मिळणार 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला आज मंजुरी देण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

Sandeshkhali Case: शाहजहान शेख यांच्यावर टीएमसीची मोठी कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित

संदेशखळी प्रकरणातील मुख्य आरोपी शाहजहान शेख याला तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पक्षातून निलंबित केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीने शाहजहान शेख यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ९ ते १० जागा लढवणार?


महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दोन दिवसात ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. तर काँग्रेस 15 ते 18 जागा लढणार असल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीचा दोन दिवसात जागा वाटपाचा फॉर्मुला ठरणार


महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दोन दिवसात ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट वीस जागा लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.

Nagpur: लग्न मोडण्यासाठी तरुणाचा प्रताप; यूट्यूबवर बघून बनवला बॉम्ब

जुळलेले लग्न तोडण्याची धमकी देण्याच्या इराद्याने अनोळखी व्यक्तीने घराच्या लोखंडी फाटकावर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मिनी टाइमबॉम्ब अडकवून ठेवल्याच्या घटनेने आर्वी शहरात खळबळ उडाली. ही घटना येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील ज्ञानेश्वर काळमोरे यांच्या घरी बुधवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास उघड झाली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे.

महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबतं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत.

सायकलपटू अवनीत सैनींचा अपघाती मृत्यू

सायकलपटू अवनीत सैनी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

गृहमंत्री अमित शाह घेणार विदर्भातील मतदारसंघांचा आढावा

गृहमंत्री अमित शाह ५ मार्चला अकोला दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेतील.

उद्या विधान परिषदेचे १० आमदार होणार निवृत्त

उद्या विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार आहेत. आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजोरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील यांचा नावाचा समावेश आहे. विधान परिषदेत सध्या एकूण 78 सदस्य आहेत. उद्या निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31वर पोहोचणार आहे.

नाना पटोले शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक'वर दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद पवार यांची भेट घेण्यासाठी 'सिल्वर ओक'वर दाखल झाले आहेत.

भाजप आमदारांचे प्रश्न फडणवीसांना खूश करण्यासाठी-रोहित पवार

सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजपाचे आमदार फडणवीसांना खूश करण्यसाठी प्रश्न करत आहेत, असं टोला त्यांनी लगावला.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीवरुन कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ

हिमाचलमध्ये काँग्रेसचे ६ आमदार ठरले अपात्र

राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश धुडकावून लावत भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारे त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणीया यांनी सांगितलं.

महायुतीचं ठरलं इच्छुक उमेदवारांची करणार अदला-बदली!

महायुतीचं ठरलं इच्छुक उमेदवारांची करणार अदला-बदली. लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ साठी NDA ची नवी शक्कल. अनेक मतदारसंघात होणार उमेदवारांची अदलाबदल पक्षाचे चिन्ह कायम ठेवण्यासाठी घटक पक्षांमध्ये करणार नेत्यांचे प्रवेश. शिरूरच्या जागेवरून नाराज असलेले आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांसोबत आढळराव पाटील यांची 'वर्षा'वर एक तासाच्या बैठकीतून तोडगा काढण्यात आला आहे.

चांदीवाल आयोगाचा आहवाल विधानसभेत मांडा; अनिल देशमुखांचं राज्यपालांना पत्र

अनिल देशमुख यांचं राज्यपालांना पत्र. चांदीवाल आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर मांडण्याची विनंती. देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

उत्तराकाशीच्या बोगदा दुर्घटनेत रॅट मायनर म्हणून काम केलेल्या कामगाराचं घर पाडलं!

उत्तराकाशीच्या बोगदा दुर्घटनेत रॅट मायनर म्हणून काम केलेला कामगार वकील हसन याचं घर दिल्ली महापालिका प्रशासनानं पाडलं आहे. या घटनेबाबत हसन यांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्या मुलाला मारहाण झाल्यांचही त्यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavhan: अशोक चव्हाणांच्या कारखान्याला शिखर बँकेकडून १४७.४७ कोटींची थकहमी

सत्ताधारी नेत्यांवर सरकार मेहरबान झाल्याचं दिसत आहे. अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला शिखर बँकेकडून १४७.४७ कोटींची थकहमी देण्यात आली आहे.

Nashik News: नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प

नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. दोनशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. दोन ते तीन महिन्याचा पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. पहाटेपासूनच तपोवन मध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही असा कर्मचाऱ्यांनी पवित्रा घेतला आहे.अचानक बस बंद झाल्यानें प्रवाशांचे हाल होत आहेत.

Nilesh Rane: हॉटेल कर थकबाकीप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांना दिलासा

हॉटेल कर थकबाकीप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांना पुणे महापालिकेकडून दिलासा मिळाला आहे. निलेश राणे यांनी २५ लाख रुपये थकबाकी पोटी भरले आहेत.

Sandeshkhali incident:भाजपच्या आंदोलनामुळेच शेख शाहजहनला अटक; सुकांता मुजुमदार यांचा दावा

संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी शेख शाहजहन यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार म्हणालेत की, भाजपच्या आंदोलनामुळेच शाहजहन यांना अटक करण्यात आली. अन्यथा राज्य सरकार टाळाटाळ करत होते.

Farmer Protest: मृत शेतकऱ्याचे अंत्यसंस्कार करणार; सरवन सिंग पंढेर यांची माहिती

आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या प्रकरणात एआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांचे पार्थिक ताब्यात घेऊन आम्ही अंत्यसंस्कार करणार आहोत, अशी माहिती शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे.

Badjhar Ghat : बडझार घाटात पिकअप वाहनाच्या अपघातात 14 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

मध्य प्रदेश: दिंडोरी येथील बडझार घाटात पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती दिंडोरी जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी दिली.

Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशातील विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ लिंकद्वारे दिल्लीत बसून मध्य प्रदेशातील 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी किंवा उद्घाटन करतील. एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीये.

Salim Kutta Dance Case : सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सप्रकरणी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

Nagpur Budget : नागपूर महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प

नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. नागपूर मनपाचे आयुक्त डॅा. अभिजित चौधरी ३५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Sandeshkhali Violence : संदेशखाली हिंसाचारातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहाँला अटक

कोलकाता : संदेशखाली हिंसाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शहाजहाँ यांना पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. २४ परगना जिल्ह्यातील मिनाखन परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना बशीरहाट कोर्टात हजर करण्यात आलं आहे. संदेशखाली येथील अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप शहाजहाँवर आहे. याशिवाय अनेकांनी त्याच्यावर जमीन बळकावल्याचाही आरोप केला आहे.

Latest Marathi News Live Update
Sandeshkhali Violence: संदेशखाली हिंसाचार प्रकरणी टीएमसीचे नेते शेख शहाजहाँ यांना अटक

तळसंदे येथे काॅंक्रिटचा टॅंकर उलटला, चालक जखमी

घुणकी : वाठार - वारणानगर मार्गावरील तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण समूहानजीकच्या धोकादायक वळणावर मंगळवारी मध्यरात्री टँकर उलटला. यात चालक जखमी झाला. रस्त्यावर टॅंकर आडवा असल्याने दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली.

Maratha Reservation : परीक्षांमुळे तीन मार्चपर्यंतचे कार्यक्रम स्थगित - मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि ‘सगेसोयरे’ बाबतची अंमलबजावणी, यावर मी ठाम आहे. मला अटक झाली अथवा चौकशी झाली तरी माझी भूमिका कायम राहील. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सामाजिक उपक्रम होत असल्याने तीन मार्चपर्यंत ठरलेले सर्व कार्यक्रम मी स्थगित केले आहेत. आंदोलनाचे रूपांतर सर्वत्र साखळी उपोषणात केले आहे,’’ अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

BJP Meeting : भाजपच्या निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक; लोकसभेसाठी शंभराहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणेची शक्यता

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २९) दिल्लीत होणार असून यात शंभराहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे राहण्याची शक्यता आहे.

Shrikant Deshpande : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंची पदावरून उचलबांगडी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार असून यात शंभराहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याजागी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलीये. महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असल्याचा दावा केला जात असला तरी अद्यापही वंचित बहुजन आघाडीने त्यांना किती जागांवर निवडणूक लढवायची आहे, याचा प्रस्ताव आघाडीला दिलेला नाही. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा विदर्भाच्या आशीर्वादाने आम्ही देशभरात चारशे जागांचा टप्पा पार करू, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.