'मैं अटल हूँ' या चित्रपटाचा एक विशेष शो राज्यातील आमदारांसाठी ठेवण्यात आलेला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता विधीमंडळात हा शो प्रदर्शित होईल.
गुजरातच्या वडोदऱ्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थी असा एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या ट्रिपसाठी गेले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत आणि वडोदरा बोटीच्या अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रेल रोको आंदोलनासाठी जात असताना बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी इथं गेलं आहे. या ठिकाणी जरांगे आणि बच्चू कडू यांच्यासह सरकारी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. यावेळी ७ हजार गावांमध्ये नोंदी सापडलेल्या नाहीत. तहसिलदार काम करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी बच्चू कडू यांनी थेट विभागीय आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली आणि कलेक्टर झोपा काढताहेत का? असा सवाल केला. तसेच तहसिलदार काम करत नसतील तर त्यांच्या थोबाडीत मारेन असंही कडू म्हणाले आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली.
हनुमान चालिसा प्रकरणात राणा दाम्पत्याला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. तसेच २१ फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे.
कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाणला २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजप आणि आसामचे मुख्यमंत्री राज्यात फूट पाडत आहेत. भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री कोणी असतील तर ते हेमंत बिस्व शर्मा आहेत, असं राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान म्हणालेत.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची गेल्या नऊ तासांपासून एसीबी अधिकारी चौकशी करत आहेत. राजन साळवी एसीबी आधिकाऱ्यांना बँकेतील लॉकर खोलून दाखवणार आहेत.
संसद सुरक्षा भेद प्रकरणात आरोपीची जामीन याचिका पटियाला कोर्टाने फेटाळली आहे. आरोपी निलम आझादने जामिनाची याचिका केली होती.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना अडीच वाजेपर्यंत सुट्टी असेल.
कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. २० तारखेला मुंबईकडे रवाना होणारच असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या समन्सवर, आपच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल हे 'कत्तर इमानदार' नेते आहेत. भाजपला या प्रामाणिकपणाची भीती वाटते. आमचा एकही नेता भ्रष्ट नाही. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तपास सुरू असतानाही आमच्या एकाही नेत्याकडून एक पैसाही वसूल झालेला नाही. अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा भाजपचा हेतू आहे. त्यामुळे ते हे षडयंत्र रचत आहेत. आम्ही प्रामाणिक आहोत... आम्ही भाजपला घाबरत नाही...'
केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 17 राज्यांमधून 17 जानेवारीपर्यंत कोविड 19 च्या JN.1 प्रकाराची 1654 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
नागपूर: दावोसमध्ये 2024 च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "दावोसमध्ये सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि औद्योगिक व्यापार मंचाला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार राजकीय परिस्थिती आणि भ्रष्टाचार पाहतो. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी दावोसच्या 7-8 भेटींमुळे सुरू झालेल्या प्रकल्पांची यादी जाहीर करावी"
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.
NCP: सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी बोलताना अजित पवारांनी अवधुत गुप्ते यांच्या गीताचं कौतुक केलं.
Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी ४ वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
Ram Mandir Postal Ticket Narendra Modi:राममंदिरासंदर्भात पोस्टल तिकीट जारी करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलं आहे.
Belgaum Maharashtra Officers Restricted: महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दिला आहे.
NCP: अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी मेळावा सुरु आहे. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा सत्कार करण्यात आला. अजित पवार गटाचं गाणंही यावेळी लाँच करण्यात आलं.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा आरोप साळवी यांच्यावर करण्यात आला आहे. पोलीस एफआयआरमध्ये आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे.
बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या आरोपींनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी चार ते सहा आठवड्यांचा वेळ मागितला आहे. गेल्या 24 तासांत, किमान तीन दोषींनी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आरोग्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही दोषींच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी आणखी वेळ देण्याच्या याचिकेवर उद्या 19 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्व दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याची मुदत देण्यात आली होती.
येत्या २ दिवसात म्हणजेत २० तारखेच्या मराठा आंदोलनाची मनोज जरांगेकडून तयारी सुरू केली आहे. आज त्यांनी ट्रक्टर चालवत तयारीची आढावा घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आसाम, मेघालय या तीन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' आसामच्या शिवसागरमध्ये पोहोचली आहे.
अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा करण्यापूर्वी आज (गुरुवारी १८ जानेवारी) मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. दरम्यान, 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1.20 ते 1.28 पर्यंत आहे. सर्व 131 वैदिक पुजारी दुपारी 12 वाजता रामजन्मभूमी गर्भगृहात पोहोचतील. या मुहूर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून 24 वेगवेगळ्या पद्धतीने पूजा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
एसीबीची टीम राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांची चौकशी केली जात असून त्यांच्या घराची झाडाझडती केली जात आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किल्ले शिवनेरी दौऱ्यावर जाणार आहेत. 21 जानेवारीला ते हा दौरा करणार आहेत. या नंतर आदित्य ठाकरेंची सभा आहे.
इराणने मंगळवारी रात्री (१६ जानेवारी) पाकिस्तानातील काही दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर आज पाकिस्तानने इराणमधील कित्येक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. असे वृत्त समोर येत आहे. रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, बीएलए या इराणमधील दहशतवादी संघटनेचे तळ पाकिस्तानने उद्ध्वस्त केले आहेत. इराण किंवा पाकिस्तान यांपैकी एकाही देशाने या हल्ल्यांची अधिकृत पुष्टी केलेली नाही. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पालघर लोकसभा उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्रीय व राज्यस्तरीय महायुतीकडून उमेदवार घोषित केला जाईल. बोईसर येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे विभागीय संपर्कप्रमुख नरेश मस्के यांनी पालघर लोकसभेचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित हेच राहतील, असे जाहीर केले होते. मात्र महायुतीने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पालघर लोकसभा प्रभारी राणी द्विवेदी यांनी वरिष्ठ पातळीवर अजूनही उमेदवार ठरलेला नाही, असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळाला कमालीची उत्सुकता आहे.
मणिपुरमधून हिंसाचाराची अजून एक महत्वाची माहिती समोर आली असून मोरेह परिसरात दोन मणिपूर पोलिस कमांडो ठार झाले आणि सहा जण जखमी झाले असल्याचे समजत आहे. बुधवारी पहाटे, सशस्त्र अतिरेक्यांनी राज्य पोलिसांच्या पथकावर हल्ला केला, ज्यात सोमोरजित मीतेई आणि ताखेलम्बम सिलेश्वर सिंग असे दोन कमांडो ठार झाले.
एसी कोचमधील घटना पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये कोच अटेंडन्टने नऊ वर्षांच्या चिमुकलीला शौचालयात कोंडून अश्लील चाळे केले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी अटेंडन्टला चांगलेच बदडले. ही घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद मुन्नू (३०) रा. चाकण, गया असे आरोपी अटेंडन्टचे नाव आहे.
कोविड काळातील खिचडी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले युवा सेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना दुपारच्या सुमारास पी एम एल ए कोर्टात हजर केल जाणार आहे. वैद्यकीय चाचणी झाल्यावर त्यांना हजर केलं जाणार आहे.
लगाव कुऱ्हे (ता. इगतपुरी) येथे पोल्ट्री फार्मच्या आडून चालविला जाणारा बनावट देशीदारुचा कारखानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. जमिनीत खोलवर दारुसाठी वापरण्यात येणार्या स्पीरिटच्या टाक्या आढळून आल्या.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एक्साईजच्या पथकाने सुमारे १४ लाखांचा साठा व साहित्य जप्त केले आहे
उत्तराखंडमधील सोनप्रयागजवळ गुरुवारी एक डंपर खड्ड्यात कोसळल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक आधिकाऱ्यांनी हि माहीती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. बुधवारी थायलंडमधील सुफान बुरी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 22 लोक ठार झाले असे वृत्त समोर येत आहे. तर सुमारे 10 जण बेपत्ता असल्याचे समजत आहे.
बदलापूर खरवई एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचे समोर आले. या स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूर : येथे नवी वाशीनाका येथील बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या बनावट डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. स्वप्नील केरबा पाटील (वय ३२, रा. बालिंगा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामाची मूर्ती आणण्यात आली आहे. क्रेनच्या साहाय्याने मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली.
लुसाका (झांबिया) : दक्षिण आफ्रिकन देश झांबिया कॉलराच्या तीव्र उद्रेकाशी झुंजत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून देशात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 10,000 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. कॉलरामुळे देशभरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राजधानी लुसाकामधील एका मोठ्या फुटबॉल स्टेडियमचे उपचार केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे.
थायलंडमधील सुफान बुरी येथे फटाक्यांच्या कारखान्यात काल (बुधवारी १७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी दादर, मुंबईतील शिवाजी पार्क उजळून निघाले आहे. नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
कऱ्हाड : स्वयंपाकाचा सिलिंडर लिकेज होऊन गॅस गळतीने झालेल्या स्फोटासह आगीत सात जण जखमी झाले. येथील बुधवार पेठेतील महात्मा फुले नगर येथे रात्री दहाच्या सुमारास घटना घडली. आगीच्या घटनेतील जखमी झालेल्यांना त्वरित उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह पोलिसही त्वरित घटनास्थळी पोचल्याने तेथे मदतकार्य राबविण्याचे काम सुरू होते. अनिता सुनील मोरे, उमेश आबा दुबळे, संगीता सदाशिव भोसले, अमोल सदाशिव भोसले, किरण राजू बडेकर, मालन राजाराम भोसले व मालन दत्तू मोरे अशी जखमींचा नावे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
Latest Marathi News Live Update : राज्यात संक्रांतीनंतर किमान तापमानात वाढ झाली असली तरीही गारठा कायम आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवेतील गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवस हा गारठा कायम राहील, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अयोध्येतील कार्यशाळेतून रामलल्लाची मूर्ती मंदिराकडं कडेकोट बंदोबस्तात रवाना झाली आहे, तर, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील राम मंदिर सोहळ्याला हजेरी लावण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर बीएमसी खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीने युवासेनेच्या सूरज चव्हाणला अटक केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये 20 जानेवारीला आंदोलन करणार आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.