"पहिला टप्पा, उत्तम प्रतिसाद! आज ज्यांनी मतदान केले त्या सर्वांचे आभार. आजच्या मतदानातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हे स्पष्ट आहे की संपूर्ण भारतातील लोक विक्रमी संख्येने NDA ला मतदान करत आहेत," असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गाझियाबाद, यूपी येथील २० वर्षीय आरोपी रोहित त्यागीला अटक. त्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अभिनेता सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत कार बुक केली होती. त्याला दोन दिवसांसाठी वांद्रे पोलिसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहेः मुंबई पोलिस
विजापूरमधील भैरमगडच्या चिहका गावाजवळ निवडणूक ड्युटीवर असताना आयईडी स्फोटात जखमी झालेल्या CRPF जवानाचा आज मृत्यू झाला.
बाबा रामदेव यांच्या पतंजली ट्रस्टला ४.५ कोटी रुपयांचा टॅक्स भरावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये महाआघाडीच्या बाजूने मतदान झाले आहे, असा विश्वास बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील चारही जागा आम्ही जिंकू, असंही ते म्हणाले.
शहापूर येथील कळमगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
लोकसभा निवडणुक मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आज पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 77.57% मतदान झाले. ही आकडेवारी आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तुलनेत सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान आज नागपूर आणि रामटेक मतदारसंघात पाच वाजेपर्यंतचे सरासरी मतदान
नागपूर लोकसभा ४७.९१ टक्के
रामटेक लोकसभा ५२.३८ टक्के
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा होणार असून 29 तारखेला मोदी पुण्यात मुक्कामी राहाणार आहेत. राजभवन येथे प्रशासनाकडून राहण्याच्या व्यवस्थेची तयारी सुरू करण्यात आली असून 30 एप्रिल रोजी सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी मोदींची सभा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी येथे एका सभेला संबोधित करताना मी भाग्यशाली आहे की मला वर्ध्यात यायला मिळालं अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमरावती आणि वर्ध्याशी आपलं विशेष नातं असल्याचे देखील सांगितले.
काही वेळापूर्वी पुण्यातील विमान नगर येथील फिनिक्स मॉलला आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान सध्या ही आग आग आटोक्यात आली आहे. मॉल मध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली असून घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
तामिळनाडू लोकसभा निवडणुकीत 51.41% आणि विलावणकोडे विधानसभा पोटनिवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 45.43% मतदान झाले.
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.35% मतदान झाले, आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी सर्वाधिक आहे.
नाशिकमधून छगन भुजबळ यांनी स्वतःहून आपण माघार घेत असल्याचे आज जाहीर केलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी नाशिकवर आपला दावा ठोकला होता. मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून छगन भुजबळ यांनी स्वतःहून आपण माघार घेतली आहे.
(दुपारी तीन वाजेपर्यंतचे सरासरी मतदान)
नागपूर लोकसभा ३८.४३ टक्के
रामटेक लोकसभा ४०.१० टक्के
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, "ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. तेव्हा भाजपने काश्मीरमधील सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, आता गृहमंत्री म्हणत आहेत की आधी आम्ही काश्मिरी लोकांची मन जिंकू आणि मग निवडणूक लढवू.
गडचिरोली जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ३ वाजता पुर्ण झाली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गांधीनगरचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, कारण या जागेचे नेतृत्व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान डॉ. तसेच पीएम मोदी हे या ठिकाणचे मतदार आहेत.
चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अशामध्ये चंद्रपूरमधील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर राडा केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
शिर्डीमध्ये आदित्य ठाकरेंची दुपारी सभा आहे. यावेळी नागरिकांना पाण्याची सोय करण्यात आली नसल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर लोकसभेत दुपारी १ वाजेपर्यंत २८.७५ टक्के मतदान झाले तर रामटेक लोकसभेत २८.७३ टक्के मतदान झाले.
Mumbai News: उन्हाळी सुट्टयांमुळे मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बटण कसं दाबा हे मी सांगणार नाही असा टोला शरद पवारांनी आजित पवारांना लगावला. ते आज बारामतीत बोलत होते.
Nagpur News: आज डीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक 5 च्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदान कक्षाच्या बाहेरील हिरवडीमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आला. त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले असते.
करमाळा तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी दोन दिवसापूर्वीच आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
नागपुरातून नितीन गडकरींच्या विरोधात उभे असणारे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 19.17 टक्के मतदान झालं आहे.
भंडार-गोंदिया - 19.72% मतदान
चंद्रपूर - 18.94% मतदान
गडचिरोली चिमूर - 24. 88% मतदान
नागपूर - 17.53% मतदान
रामटेक - 16.14% मतदान
सर्वाधिक मतदान गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतच मतदान असणार आहे. हा नक्षली भाग असल्याने वेळेची मर्यादा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी इतर मतदारांना देखील मतदान करण्याचं आवाहन केलं.
द्रमुकचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते उदयानिधी स्टॅलिन यांनी मतदानाचा हक्क बजावला.
जगातील सर्वात लहान महिला असा रेकॉर्ड असलेल्या ज्योती अमगे हिने नागपूरमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला.
देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय सेथुपती याने चेन्नईमध्ये मतदान केलं.
जम्मू काश्मीरमध्ये देखील आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याठिकाणी एक नवीन लग्न झालेलं जोडपं लग्नानंतर थेट मतदानाला गेल्याचं पहायला मिळालं. आपलं मत अमूल्य आहे, ते वाया घालवू नका असं यावेळी वधूने म्हटलं.
नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान पार पडले.
लोकसभा मतदारसंघ निहाय मतदान
रामटेक - ५.८२ %
नागपूर - ६.४१%
भंडारा-गोंदिया - ७.२२ %
गडचिरोली -चिमूर - ८.४३%
चंद्रपूर - ७.४४%
Kamal Hassan : अभिनेते कमल हसन यांनी आज चेन्नईमध्ये मतदान केलं. हसन यांचा मक्कल निधी मैयम हा पक्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी नाहीये. त्यांनी द्रमुकला आपला पाठिंबा जाहीर केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी मतदान केलं. गोंदिया येथील पोलिंग बूथमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुर विधानसभेसाठी मतदान केलं. कोराडी ग्रामपंचायत ऑफिसच्या पोलिंग बूथमध्ये त्यांनी आपलं मत नोंदवलं.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज मतदान केलं. आगरतळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपलं मत दिलं.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघातील बेला गावात स्वप्निल डांगरे हा नवरदेव आज आपल्या लग्नापूर्वी मतदानाचा कर्तव्य बजवायला पोहोचला. बेला मधील बेसिक शाळा या मतदान केंद्रावर स्वप्निलने त्याचा मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर नातेवाईकांसह लग्न स्थळी रवाना झाला.
नागपूरमध्ये जयमाता प्रा. शाळा, दिघोरी या मतदान केंद्रावर तब्बल 1 तास 10 मिनिट उशीराने मतदान सुरु झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी झाली. यावप नगरसेवक पिंटू झलके यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान ईव्हीएम मध्ये खराबी आल्याने पूर्ण युनिट बदलण्यात आले.
Uttarakhand Lok Sabha Election: उत्तराखंडातील पौरी गढवाल येथील मतदान केंद्रावर एका नवविवाहित जोडप्याने सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केले.
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदान केले.
पंढरपूर : चैत्री एकादशीनिमित्त पहाटे विठुरायाचे नित्यापूजा संपन्न झाली. आज चैत्री अर्थात कामदा एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते देवाची नित्यापूजा पार पडली. आज चैत्री यात्रेसाठी दोन लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
बंगळूर : काँग्रेसला राज्यातील मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान २० जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी व्यक्त केला. सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘आमच्या सरकारने सुरू केलेल्या पंचहमी योजना कोणत्याही कारणास्तव बंद केल्या जाणार नाहीत. सध्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल आणि त्या योजना सुरूच राहतील.
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान एकाचवेळी होत आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्व ६० आणि सिक्कीममधील ३२ विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे.
मतदान हे आपले कर्तव्य आहे, आपला हक्क आहे. १०० टक्के मतदान झालं पाहिजे. मी माझं मत दिलं आहे, तुम्हीही द्या, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात होत आहे. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १०२ जागांसाठी मतदान होत असल्यामुळे या जागांवर मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
बेळगाव : ऐन उन्हाळ्यात बेळगाव शहरातील दक्षिण भागात पाणीटंचाई उद्भवणार आहे. १९ व २० एप्रिल रोजी दक्षिण भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती एल ॲन्ड टी कंपनीकडून देण्यात आली आहे.
सांगली : सांगली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्यावतीने आज (ता. १९) उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. शक्तिप्रदर्शन करत स्टेशन चौक ते मारुती चौक या दरम्यान रॅली काढण्यात येणार असून, बजरंगबलीचे दर्शन घेऊन अर्ज दाखल करणार आहेत.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. येत्या १० मे रोजी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर तब्बल ११ वर्षांनी निकाल लागणार आहे. डॉ. दाभोलकर हे २० ऑगस्ट २०१३ मध्ये मॉर्निंग वॉकला गेले असताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.
Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आज २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सांगली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये असलेला तिढा सुटला असून ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केलीये. कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी हजेरी लावलेल्या वळवाने गुरुवारीही काही ठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. काँग्रेसला राज्यातील मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान २० जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.