राज्यात कोरोनोबाधितांचा उच्चांक ते रतन टाटा पुन्हा आले मदतीला; ठळक बातम्या क्लिकवर

दिवसभरातील देशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
AAJ DIVASBHARAT
AAJ DIVASBHARATSakal Media
Updated on

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45 हजार 654 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. चिंता वाढवणारी माहिती म्हणजे दिवसभरातील मृत्यांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 503 रुग्णांना कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये स्थिती चिंताजनक आहेच. पण त्याचवेळी देशातील अन्य राज्यातही परिस्थिती फार चांगली नाहीय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी, कोरोना व्हायरसची तिसरी लाट लवकरच येऊ शकते असे विधान केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि दुसरीकडे आरोग्य सुविधा तोकड्या पडत आहेत. अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांनी रांगा लावण्याचे चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर टाटा स्टील मदतीसाठी पुढे आली असून दररोज 300 टन ऑक्सिजन पुरवणार असल्याचं जाहीर केलंय.

Corona Update: गेल्या 24 तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45 हजार 654 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. वाचा सविस्तर-

देश- महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवडा भरुन काढण्यासाठी रेल्वेनं राज्यातून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे राज्यासाठी तातडीने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली होती. यानंतर रेल्वे मंत्रालयानं रेल्वेद्वारे द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन (LMO) पुरवण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर-

Fact Check: - न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरसमोर पैसे उधळणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वाचा सविस्तर-

देश- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर-

देश- माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत असलेल्या मृत्यूंप्रकरणी काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक सभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीकास्त्र सोडलं. वाचा सविस्तर-

देश- केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलंय की सरकार रेमडेसिव्हिर इंजेक्शचे उत्पादनाला वाढवण्याबाबत तसेच त्याच्या किंमतींमध्ये घट करण्यावर सध्या काम करत आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये स्थिती चिंताजनक आहेच. पण त्याचवेळी देशातील अन्य राज्यातही परिस्थिती फार चांगली नाहीय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी, कोरोना व्हायरसची तिसरी लाट लवकरच येऊ शकते असे विधान केले आहे. वाचा सविस्तर-

IPL 2021 : दिल्ली विरुद्ध पंजाब मॅचचे लाईव्ह अपडेट येथे वाचा-

मनोरंजन- प्रभासने पूर्ण केली चाहत्याची अंतीम इच्छा ; भेटीनंतर मिळाले 10 दिवसांचे जीवनदान. वाचा सविस्तर-

RCB vs KKR : रॉयल चेलेंजर्सची विजयी हॅटट्रिक. वाचा सविस्तर-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.