नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. २२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्यातच श्रीराम जन्म भूमी ट्रस्टने राम मंदिर निर्माण कार्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.(Latest visuals of the under construction Ram Temple in Ayodhya Uttar Pradesh)
व्हिडिओमध्ये राम मंदिराच्या भव्यतेची लगेच जाणीव होते. राम मंदिर हे अद्भूत आणि अप्रतिम असणार आहे. राम मंदिरातील सजावट अत्यंत आकर्षक करण्यात आली आहे. नक्षीकामाला तर तोडच नाही. राम मंदिरात अनेक मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. हिंदू संस्कृतीचा वारसा दर्शवणाऱ्या या प्रतिमा आहेत. मूर्ती घडवताना विशेष लक्ष देण्यात आले आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ १६ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे. राम लल्लाची मूर्ती निश्चित करण्यात आली आहे. १७ जानेवारीला ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. या काळात मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असणार आहे. धार्मिक पंरपरेनुसार ही काळजी घेण्यात आलीये. प्राणप्रतिष्ठेआधी मूर्तीची यात्रा काढली जाणार आहे.
राम मंदिर सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी जवळपास ८ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. यासाठी देश-विदेशातच्या प्रमुख लोकांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था चोख करण्यात आली आहे. २२ जानेवारीला या मान्यवर लोकांव्यतरिक्त कोणालाही अयोध्येत प्रवेश नसेल. २२ जानेवारीला राम मंदिर लोकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येईल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.