हरयाणा : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

हिस्सारच्या पोलीस महानिरिक्षकांच्या घराबाहेर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन
Haryana Farmer protest
Haryana Farmer protestFile Photo
Updated on

चंदीगड : हरयाणात (Haryana) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन एक आठवड्यानं वाढवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar lal Khattar) यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या एका जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज (baton charged) केला यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. (Lathi charge on agitating farmers during Haryana CMs program)

Haryana Farmer protest
'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!

शेतकरी नेत्यांनी आरोप केला की, "यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला तसेच अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं." दरम्यान, पोलिसांनी लावलेली बॅरिकेट्स काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. तसेच या कारवाईच्या घटनेनंतर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ९ सुमारे दोन तास अडवून धरला होता, अशाही बातम्या येत आहेत. त्यामुळे ग्रँट ट्रंक रोड दुपारी ३ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रोखण्यात आला होता.

Haryana Farmer protest
सातव यांना पोस्ट कोविड न्यूमोनिया; रुग्णालयाचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जची खबर मिळताच भारतीय किसान युनियनचे गुरनाम सिंग चारुनी हिस्सार येथे दाखल झाले. तसेच पोलिसांनी जर ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका केली नाही तर हरयाणातील पोलीस स्थानकांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर हिस्सारच्या पोलीस महानिरीक्षकांच्या घराजवळ शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

Haryana Farmer protest
फेसबुकवरील मित्रानं केला घात; महिलेवर २५ जणांकडून अत्याचार

चौरुनी म्हणाले, "मला मुख्यमंत्री खट्टर यांना विचारायचं आहे की, त्यांच्या कार्यक्रमासाठी ५०० हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. याऐवजी त्यांना ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम घेता आला नसता का? तुम्हाला या कार्यक्रमाला वैयक्तिकरित्या हजेरी लावण्याची काय गरज होती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()