नवी दिल्ली : भारतात नव्यानं सादर होत असलेलं डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सोमवारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. हे प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सेवेसाठी कुठलंही अॅप, इंटरनेटची आवश्यकता नाही.
या सेवेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशात डिजिटल पेमेंट आणि थेट बँक ट्रान्सफरला चालना देण्यासाठी e-RUPI व्हाऊचर महत्वाची भूमिका बजावेल. यामुळे सर्वांना नेमकं, पारदर्शी आणि अडथळ्याविना मोफत पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे."
एकवीसाव्या शतकात भारत कशा पद्धतीनं पुढे चालला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानानं लोकांशी कसा जोडला जात आहे, याचं e-RUPI सेवा हे एक उदाहरण आहे. देशातील नागरिक ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना ही सेवा सुरु झाली असून याचा मला खूप आनंद होत आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
प्रत्यक्ष रोख रक्कम न देताही करता येईल मदत
केवळ सरकारीच नव्हे तर खासगी संस्थांना जर कोणाला शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय सेवेसाठी मदत करायची असेल त्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी e-RUPI प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. तुम्ही दान केलेली रक्कम ही केवळ संबंधित कामासाठीचं खर्च केली जाईल याची तुम्हाला खात्री मिळेल, असंही मोदींनी यावेळी सांगितंल.
काय आहेत e-RUPI चे फायदे?
e-RUPI कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट आहे
योजनेचा लाभ देणारे आणि लाभ घेणारे दोघांशी डिजिटली संपर्क करता येणार आहे
कल्याणकारी योजना थेटपणे कोणत्याही थर्ड पार्टीशिवाय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत
यामध्ये क्यू-आर कोड किंवा एसएमएसच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे
कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप, इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार आहे
e-RUPI मानवी हस्तक्षेपाशिवाय सेवांचे प्रायोजन, लाभार्थी आणि सेवा पुरवणारे यांचा डिजिटली जोडले ठेवणार आहे
व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सेवा पुरवणाऱ्याला पेमेंट मिळणार आहे
e-RUPI प्री-पेड स्वरुपाचे आहे आणि वेळेवर पेमेंट व्यवहार होतो
बालकल्याण, टीबी निर्मूलन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान या सरकारी योजनांसाठी ई-रुपी कार्डचा वापर केला जाऊ शकतो
हे डिजिटल व्हाऊचर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही वापरता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.