West Bengal: टीएमसी नेत्याला सोडा नाहीतर ड्रग्ज प्रकरणात; CBI न्यायाधीशांना धमकी

न्यायाधीश आणि तुमच्या परिवाराला NDPS प्रकरणात आडकवले जाईल.
CBI
CBIesakal
Updated on

पश्चिम बंगाल मधील आसनसोल CBI कोर्टाचे न्यायाधीश राजेश चक्रवर्ती यांना धमकीचे पत्र दिल्याच्या आरोपात वकील सुदीप्त रॉय यांना अटक केली आहे. वकिलाच्या जवळचे सहकारी आणि टीएमसीचे दिग्गज अनुब्रता मंडल यांना जामीन देण्याची मागणी केली होती. वकीलाने पत्रात लिहील आहे, की जर ममता बॅनर्जी यांच्या जवळचे अनुब्रत मंडल यांना जामीन दिला नाही, तर न्यायाधीश आणि तुमच्या परिवाराला NDPS प्रकरणात आडकवले जाईल.

हा गुन्हा नशेच्या पदार्थांचे सेवन केले, नशेचे पदार्थ बनवले, त्यांची खरेदी विक्री केली तर हा गुन्हा लावला जातो. त्याला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 असे म्हणतात. त्याला शॉर्ट मध्ये NDPS कायदा म्हणतात.

जानवरांच्या तस्करी प्रकरणी CBI नी अनुब्रत मंडल यांना 11ऑगस्टला अटक केली आहे. त्यांच्या नंतर अनुब्र मंडल यांना आसनसोल च्या CBI कोर्टात हजर केले होते. तिथे त्यांना 10 दिवसाच्या रिमांडवर पाठवल होत. त्याच्या नंतर अनुब्रत मंडल यांना पुन्हा 24 ऑगस्टला 14 दिवसाच्या न्यायालयन कोठडी दिली होती. याच्या आगोदर अनुब्रत मंडल यांच्या वकीलांनी मेडीकलसाठी जामीन मागितला होता. पण कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाने अनुब्रतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता त्यांना 7 सप्टेंबरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

CBI
मुलीवर बलात्कार प्रकरणात न्याय मागण्यासाठी गेलेल्या आईवर पोलीसाने केला बलात्कार

आसनसोल SPL,CBI कोर्टाच्या न्यायाधीश राजेश चक्रवर्ती यांनी सांगितल की त्यांनी जानावरांच्या तस्करांच्या प्रकरणात अटकेत असलेले अनंब्रत मंडल यांच्या जामीनासाठी मला धमकीचे पत्र मिळेले होते. अनुब्रताला जामीन न मिळाल्यास तिच्या कुटुंबीयांना एनडीपीएस प्रकरणात अडकवल जाईल, असे त्यात लिहीले आहे. टीएमसी बीरभूमचे जिल्हाध्यक्ष अनुब्रता मंडल यांना सीबीआयने जनावर तस्करी प्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी काल त्यांची सीबीआय कार्यालयात चौकशीही करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.