Kerala News : यंदा उष्णतेचा तडाखा भारतभर पाहायला मिळत आहे. भारताच्या उत्तर भागात तापमानाचा पारा ४० डिग्री पार गेला आहे, ज्यामुळे अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. दक्षिण भारतात सुद्धा गर्मीमुळे लोक त्रासले आहेत. यातच आता केरळ उच्च न्यायालयाने वकिलांना दिलासादायक बातमी दिली आहे.
केरळ उच्च न्यायालयाने गर्मीमुळे केरळच्या वकिलांना गाऊन न घालण्याची मुभा दिली आहे. केरळ वकिलांनी यापूर्वी गाऊन न घालण्याच्या परवानगीची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायपालिकेच्या न्यायपालीकांमध्ये वकिलांनी काळा कोट आणि गाऊन न घालण्याच्या वकिलांच्या मागणीला परवानगी दिली आहे. तसेच पांढरा शर्ट घालण्याची परवानगी दिली आहे.
मिडीया रिपोर्टनुसार, आता उच्च न्यायालयात उपस्थित राहणाऱ्या वकिलांना सुद्धा गाऊन घालणे एच्छिक असणार आहे. केरळ उच्च न्यायालयाच्या ऍडव्होकेट्स असोशिएसनच्या प्रस्तवावर विचार करुन ठराव मंजूर करण्यात आला आहे. या अहवालानूसार, मोठ्या प्रमाणात वाढत असलेली गर्मी आणि राज्यातील संपूर्ण वकिलांच्या समोर येणाऱ्या समस्यांचा विचार करुन वकिलांना गाऊन न घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वकिलांना गाऊन न घालण्याची परवानगी ३१ मे २०२४ पर्यंत असणार आहे. राज्यातील अनेक वकिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
वकिलांनी काळा कोट घालण्याची परंपरा १३२७ मध्ये तिसरा एडवर्ड याने कायदा लागू केल्यापासून आहे. त्याकाळी सुद्धा वेगळ्या प्रकारचा पोशाख बनवला जायचा. त्यावेळी वकिलांसाठी काळ्या रंगाचा गाऊन किंवा पोशाख नव्हता. तेव्हा वकिल लाल किंवा तपकिरी रंगाचा पोशाख घालत असायचे तर न्यायाधीश पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करत असायचे.
१६३७ साली एक प्रस्ताव आला आणि सर्व वकिलांना आणि न्यायाधीशांना आपला पोशाख सामान्य जनतेपेक्षा वेगळा करण्यास सांगितले गेले. तेव्हा वकिलांना पूर्ण लांबीचा गाऊन घालण्यास सांगितले गेले आणि तेव्हापासून पूर्ण लांबीच्या गाऊनची फॅशन सुरु झाली.
काही लोकांचे असे सुद्धा म्हणने आहे की १६९४ साली क्वीन मेरीचा चेचकांपासून मृत्यू झाला. तेव्हा किंग विलीयम्सने सर्व वकिलांना आणि न्यायाधीशांना शोक साजरा करण्यासाठी गाऊनमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आणि त्यानंतर वकिल काळा कोट घालायला लागले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.