राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Laxmikant Dixit passed away: अयोध्या मंदिरातील राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
 Laxmikant Dixit
Laxmikant Dixit
Updated on

नवी दिल्ली- अयोध्या मंदिरातील राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते आजाराची झुंजत होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांनी वाराणसीमध्ये शेवटचा श्वास घेतला. दीक्षित यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाटमधील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ आचार्य होते. या विश्वविद्यालयाची स्थापना काशी नरेशच्या सहयोगाने केली गेली होती. आचार्य लक्ष्मीकांत यांची यजुर्वेदातील मोठे पंडित म्हणून ओळख होती.

 Laxmikant Dixit
Property Market: येत्या काही वर्षांत अयोध्या, नागपूर, शिर्डीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात होणार मोठी वाढ; काय आहे कारण?

प्रत्येक प्रकारच्या पूजा विधिमध्ये ते पारंगत होते. त्यांनी वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा आपले चुलते गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून घेतली होती. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊर गावाचे रहिवाशी होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी काशीमध्ये स्थलांतर केलं होतं. त्यांच्या पूर्वजांनी नागपूर आणि नाशिकमध्ये देखील धार्मिक अनुष्ठान केले आहे.

लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या पूर्वजांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केला होता असं सांगितलं जातं. लक्ष्मीकांत यांचे पुत्र सुनील दीक्षित यांनी यासंदर्भातील दावा केला होता. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

 Laxmikant Dixit
गीत रामायणातील ‘अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गाणं ऐकल्यापासूनच प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानाला भेट द्यायची ओढ अखेर चाळीस वर्षांनी पूर्ण

लक्ष्मीकांत दीक्षित यांचा जन्म १९४२ मध्ये मुरादाबाद येथे झाला होता. लहान असताना ते शुक्लयजुर्वेद शास्त्र आणि वेदांचा अभ्यास करण्यासाठी वाराणसी येथे आले होते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आजन्म काशीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे अंत्यसंस्कार मणिकर्णिया घाटावर केले जाणार आहे. त्यांना मुखाग्नि त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयराम दीक्षित देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.