Rahul Gandhi: "यंदा विरोधकांचा आवाज अधिक मोठा आहे"; राहुल गांधींकडून बिर्लांचं केलं अभिनंदन

ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली : ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याबद्दल विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांचं अभिनंदन केलं तसंच विरोधक यंदा जास्त ताकदवान आहे, याची जाणीव करुन दिली. तसंच त्यांना काम करण्यात आमचं पूर्ण सहकार्य असेल असंही यावेळी विरोधीपक्ष नेत्यानं म्हटलं आहे. (Leader of Oppositon of Loksabha Rahul Gandhi says this time opposition is louder due to congratulated Om Birla)

विरोधी पक्षनेते, राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. संपूर्ण विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीच्यावतीनं मी तुमचं अभिनंदन करू इच्छितो. हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करतं आणि तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच आहात.

Rahul Gandhi
Lok Sabha Speaker Election: 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ओम बिर्ला जिंकले; आवाजी मतदानानं झाली निवड

सरकारकडं राजकीय शक्ती आहे परंतू विरोधीपक्ष देखील भारतीय लोकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करतंय आणि यावेळी विरोधीपक्ष गेल्या वेळेपेक्षा भारतीय जनतेच्या आवाजाचं अधिक चांगलं प्रतिनिधित्व करतो. विरोधीपक्ष तुमच्या कामात मदत करू इच्छितात. सभागृहाचं कामकाज वारंवार आणि चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे.

विश्वासाच्या आधारावर सहकार्य घडवणं खूप महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षाचा आवाज या सभागृहात मांडण्याची मुभा असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.