सत्तेत राहून नितीश कुमार फक्त आपलं आयुष्य घालवताहेत : तेजस्वी यादव

Tejaswi Yadav vs CM Nitish Kumar
Tejaswi Yadav vs CM Nitish Kumaresakal
Updated on
Summary

19 लाख लोकांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनांचं काय झालं?

बिहारचे विरोधी पक्षनेते आणि आरजेडी (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी वेगानं वाढणारी महागाई आणि गुन्हेगारीवरून पुन्हा एकदा बिहार सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या वयाची खिल्ली उडवत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, नितीश कुमार फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवत आहेत. त्यांना बिहारच्या (Bihar) जनतेची कोणतीही चिंता नाहीय. त्यांना साथ देणारा भाजपही नितीश कुमारांचीच पालखी वाहत आहे, असा घणाघात तेजस्वींनी नितीश कुमारांवर केलाय.

तेजस्वी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, बिहारमध्ये महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचलीय. नितीश कुमार सरकारमुळं प्रत्येक क्षेत्रात अडचण आलंय. पण, त्यांना याचं काहीच देणं-घेणं नाहीय. मुख्यमंत्री फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवत आहेत आणि कमकुवत भाजप त्यांची पालखी वाहत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tejaswi Yadav vs CM Nitish Kumar
मोदींचं 'गुजरात' जिंकण्यासाठी काँग्रेस मोठा डाव खेळणार!

राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरून तेजस्वी यादव यांनी बिहार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 19 लाख लोकांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासनांचं काय झालं? हे भाजप (BJP) आणि जेडीयूच्या (JDU) एनडीए सरकारनं सांगावं, असा सवाल त्यांनी केलाय. राघोपूरच्या आमदारानंही राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखावर सरकारची खिल्ली उडवलीय. बिहारमध्ये दर चार तासांनी कुणावर तरी बलात्कार होतोय आणि दर पाच तासांनी कुणाचा तरी खून होतोय, असं त्यांनी नमूद केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()