वायनाड : लेबनॉन इथं झालेल्या पेजर स्फोटांच्या घटनेनं अख्ख्या जगाला हादरवून टाकलं आहे. ज्या टेक्निकनं हे स्फोट घडवण्यात आले त्यामुळं जगभरात याची चर्चा सुरु झाली. पण या स्फोटांशी केरळमधील एका तरुणाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. केरळ पोलिसांच्या तपासात याबाबत उलगडा झाला आहे.
केरळ पोलिसांच्या वायनाडच्या स्पेशल ब्रान्चनं रिन्सन जोझ (वय ३७) नामक व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. रिन्सन दहा वर्षांपूर्वीच वायनाड सोडून नॉर्वेमध्ये स्थायिक झाला आहे. पण आता त्याचा लेबनॉनमधील पेजर ब्लास्टमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
वायनाडचे स्पेशल ब्रान्चचे पोलीस उपाधीक्षक पीएल शायजू यांनी सांगितलं की, "जोझच्या वायनाडमधील कुटुंबाची माहिती गोळा केली जात आहे. पण त्याच्या कुटुंबियांना लेबनॉनमध्ये नेमकं काय घडलंय? हे माहिती नाही. तसंच ती घटना घडल्यापासून जोझ कुटुंबियांचा आपल्या मुलाशी संपर्क होऊ शकलेला नाही"
सध्या रिन्सन जोझ हा परदेशी नागरिक आहे. त्यामुळं त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येणं शक्य नाही. तसेच भारतातील चौकशीसाठी जोझला टार्गेट केलं जाऊ शकत नाही. पण जोझ हा नॉर्वेतील मल्याळम कम्युनिटीमध्ये सक्रीय असल्याची माहिती मिळते आहे. या ठिकाणी तो यापूर्वी एक जॉब कन्सल्टन्सी चालवत होता, असंही पोलीस उपअधीक्षकांनी सांगितलं.
मनोरमा ऑनलाइनच्या माहितीनुसार, रिन्सन यांचे वडील, जोस मूथेडम, एक शिंपी आहेत आणि ते मनंतावडी येथे एका टेलरच्या दुकानात काम करतात. त्यांनी सांगितले की, परिसरात त्यांना 'टेलर जोस' म्हणून ओळखले जाते. रिन्सनचा एक जुळा भाऊ जिन्सन आहे, जो यूकेमध्ये आहे, आणि एक बहीण आयर्लंडमध्ये आहे. असे समजले की रिन्सन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता आणि जानेवारीत परत गेला होता.
त्यांचे काका थंकाचन यांनी मनोरमा ऑनलाइनला सांगितले, 'रिन्सनने मेरी माथा कॉलेज, मनंतावडी येथून पदवी प्राप्त केली. त्याने एमबीए पूर्ण केले आणि नॉर्वेमध्ये केअरटेकर म्हणून गेला आणि नंतर काही व्यावसायिक फर्ममध्ये गेला. आम्हाला त्याच्या नोकरी किंवा व्यवसायाबद्दल काहीही माहिती नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.