Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

Legal Battle Begins Over Family Shares Dispute : जगनमोहन आणि शर्मिला यांच्यात पूर्वी एक सामंजस्य करार झाला होता, ज्यामध्ये जगनमोहन यांनी आपल्या शेअर्स 'प्रेम आणि स्नेह' म्हणून शर्मिला यांना देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, या कराराच्या अंमलबजावणीसाठी काही कायदेशीर बंधने आहेत, ज्यामध्ये न्यायालयीन मान्यता आवश्यक आहे.
Jaganmohan and Sharmila legal dispute over family shares in Saraswati Power & Industries
Jaganmohan and Sharmila legal dispute over family shares in Saraswati Power & Industriesesakal
Updated on

आंध्र प्रदेशातील राजकीय वर्तुळात माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या बहिणी वाय. एस. शर्मिला व आई विजयम्मा यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. हा वाद केवळ कुटुंबीयांमधील नसून शेअर हस्तांतरण आणि कंपन्यांच्या मालकीवरील दावा यावर आधारित आहे. जगनमोहन यांनी सरस्वती पावर अँड इंडस्ट्रीजच्या शेअर्सवरून शर्मिला आणि त्यांची आई विजयम्मा यांच्याविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.