आजच्या युगात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्त्व गाजवत आहेत. घर असो किंवा कामाची जागा, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. असे कोणतेही क्षेत्र राहिले नाही जिथे महिलांचे योगदान नाही.
महिला आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत, मग घरातील असो किंवा बाहेर, परंतु अशी अनेक कारणे आहेत ज्यांमुळे त्यांना पुरुषांपेक्षा जास्त समस्यांना सामोरे जावे लागते.
अशात भारतातील प्रत्येक महिलेला सरकारने दिलेल्या अधिकारांची जाणीव असायला हवी. भारतात असे अनेक कायदे आहेत जे विशेषत: महिलांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केलेले आहेत.