Video : लखनौच्या लेवाना हॉटेलमध्ये भीषण अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Video :  लखनौच्या लेवाना हॉटेलमध्ये भीषण अग्नीतांडव, दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
Updated on

UP Levana Hotel Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या लेवान हॉटेमध्ये भीषण आगी लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीमध्ये काही नागरिक अडकून पडल्याचेही सांगितले जात असून, बाचव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आग लागलेले हॉटेल लखनौमधील हजरतगंज भागात आहे. या घटनेत किती जण जखमी अथवा मृत्यू याचा आकडा अद्यापपर्यंत समोर आलेला नाही. अडकलेल्या नागरिकांना हॉटेलच्या काचा फोडून बाहेर काढले जात आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हजरतगंजच्या सुल्तानगंज भागात असलेल्या लिवाना हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जखमी झालेल्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, आतापर्यंत 20 हून अधिक लोकांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, अडकलेल्या इतर नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भीषण आग लागलेले हॉटेल लखनौ रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असून, हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशनदेखील आहे. हॉटेलमधील आगीच्या धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलमध्ये एकूण 30 खोल्या आहेत, त्यापैकी 18 खोल्यांमध्ये नागरिक होते. पहिल्या मजल्यावर बँक्वेट हॉल असून, सर्व खोल्या मिळून हॉटेलमध्ये तीस ते 35 नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी 20 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.