Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीकरांचे आयुर्मान घटणार?

‘एक्यूएलआय’चा अहवाल; दिल्लीतील हवा सर्वांत दूषित असल्याचा निष्कर्ष
Delhi Pollution
Delhi Pollutionsakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक असल्याचा निष्कर्ष एका पाहणीत समोर आला आहे. प्रदूषणाची पातळी अशीच खालावलेली राहिली तर दिल्लीकरांचे आयुष्य ११.९ वर्षांनी कमी होण्याची शक्यता यात व्यक्त केली आहे.

शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने ‘हवा गुणवत्ता जीवन निर्देशांक’ (द एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स-एक्यूएलआय) प्रसिद्ध केला आहे. भारतातील १.३ अब्ज नागरिक अशा भागात राहतात जेथे वार्षिक सरासरी प्रदूषण पातळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ठरविलेल्या ५ ग्रॅम/ घनमीटर या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

भारतातील राष्ट्रीय हवेच्या गुणवत्तेचे मानक ४० ग्रॅम/घनमीटरपेक्षा जास्त असलेल्या भागात लोकसंख्येपैकी ६७.४ टक्के लोक राहतात, असे आढळले असल्याचे निर्देशांक अहवालात म्हटले आहे.

निर्देशांक अहवालातील निरीक्षणे

  • सूक्ष्म कण वायू प्रदूषण (पीएम २.५) भारतीयांचे सरासरी आयुर्मान ५.३ वर्षांनी कमी करते. ‘डब्लूएचओ’द्वारे प्रदूषणाची निश्‍चित केलेली ५ ग्रॅम/ घनमीटर मर्यादा ओलांडल्यास ही परिस्थिती उद्‍भवू शकते

  • दिल्लीतील प्रदूषणाची पातळी खालावलेलीच असेल तर येथील एक कोटी ८० लाख नागरिकांचे आयुर्मान ११.९ वर्षांनी कमी होईल. ‘डब्लूएचओ’द्वारे हे प्रमाण ८.५ वर्षे असे निश्‍चित केले आहे.

  • पंजाबमधील पठाणकोट जिल्हा सर्वात कमी प्रदूषित असूनही प्रदूषणाचे प्रमाण ‘डब्लूएचओ’च्या निकषापेक्षा सात पट जास्त आहे. तेथील प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास अपेक्षेनुसार ३.१ वर्षांनी जीवनमान घटेल

  • उत्तरेकडील पठारी भागातील प्रदूषणास भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय घटक कारणीभूत असले तरी मानवनिर्मित घटकांमुळे त्यात भर पडली आहे. उदा.वाहतूक, निवासी आणि कृषी स्रोत

जागतिक आयुर्मानावर तीन चतुर्थांश हवेच्या प्रदूषणाचा परिणाम केवळ सहा देशांमध्ये होतो. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये प्रदूषित हवेमुळे गेल्या सहा वर्षांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

- प्रा. मायकेल ग्रीनस्टोन, एक्यूएलआयचे प्रणेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.