आग्र्यात व्यासपीठावर कोसळला लाइट स्टँड; केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले

Arjun Ram Meghwal
Arjun Ram Meghwalesakal
Updated on
Summary

या दुर्घटनेत माजी आमदार गुटियारीलाल दुबेश आणि त्यांचा चालक देखील जखमी झाला आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्र्यात काल (शुक्रवार) रात्री मोदी सरकारमधील (Modi Government) केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) हे थोडक्यात बचावलेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) आयोजित भीम नगरीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल हे व्यासपीठावर भाषण करत असताना वादळामुळं वीज गेली. याचवेळी वादळामुळं व्यासपीठावर लाईट स्टँड देखील कोसळला. दरम्यान, लाईट स्टॅंड पडल्याने मंचावर बसलेले अनेक जण गंभीर जखमी झालेत.

या दुर्घटनेत माजी आमदार गुटियारीलाल दुबेश आणि त्यांचा चालक जखमी झाला आहे. तसंच भीम नगरीच्या आयोजन समितीचे सरचिटणीस धर्मेंद्र सोनी हेही जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलंय. 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, एडीएम शहर अंजनी कुमार सिंह यांनी सांगितलं की, अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Arjun Ram Meghwal
माटुंग रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेसचा अपघात, पाहा PHOTOS

राजेश कुमार असं मृताचं नाव असून त्याचं वय 50 वर्षे आहे. अपघात झाला तेव्हा ते मंचावर उपस्थित होते. मृत माजी मंत्री डॉ. जीएस धर्मेश यांच्या चालकाचा भाऊ होता. तर दुसरीकडं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल भाषण देण्यासाठी मंचावर गेले नसते, तर कदाचित तेही जखमी झाले असते. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.