धक्कादायक! बसवलिंग स्वामींचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला; दोन पानी सुसाईड नोटही सापडली

खोलीत स्वामींनी लिहिलेली दोन पानी सुसाईड नोटही सापडली आहे.
Shri Kanchugal Bande Mutt
Shri Kanchugal Bande Muttesakal
Updated on
Summary

खोलीत स्वामींनी लिहिलेली दोन पानी सुसाईड नोटही सापडली आहे.

रामनगर (कर्नाटक) : कर्नाटकात (Karnataka) आणखी एका लिंगायत संताचा मृतदेह सापडला आहे. रामनगरमधील श्री कंचुगल बंदेमठातील (Shri Kanchugal Bande Mutt) लिंगायत (Lingayat) संत बसवलिंग स्वामी सोमवारी त्यांच्या आश्रमात मृतावस्थेत आढळून आलेत. कुडूर पोलिसांनी (Kudur Police) ही माहिती दिलीय.

पोलिसांनी या घटनेचा आत्महत्येचा गुन्हा मानून तपास सुरु केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय बसवलिंग स्वामीजी (Basavalinga Swamiji) यांचा मृतदेह मठात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, कंचुगल बंदेमठाचे मुख्य पुजारी बसवलिंग स्वामींनी नेहमीप्रमाणं त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. शिवाय, त्यांनी भाविकांचे फोनही उचलले नाहीत. यानंतर भाविकांना संशय आल्यानं सोमवारी सकाळी स्वामींच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला.

Shri Kanchugal Bande Mutt
BJP : समस्या सांगायला गेलेल्या महिलेला भाजप नेत्यानं भरकार्यक्रमात थोबाडलं; संतापजनक Video Viral

यानंतर खोलीतील दृश्य पाहून भाविकांमध्ये गोंधळ उडाला. आत साधूंचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीत स्वामींनी लिहिलेली दोन पानी सुसाईड नोटही सापडली आहे. मठ संचलित शाळेचे शिक्षक रमेश एल यांनी पोलिसांना ही माहिती दिली. मठाच्या मुख्य पुजाऱ्याला काही लोक मानहानीच्या धमक्या देऊन त्रास देत असल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलंय.

Shri Kanchugal Bande Mutt
VIDEO : प्रवचन देताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका; लोक म्हणाले, असा मृत्यू करोडोंमध्ये एकालाच मिळतो!

बंदेमठ 400 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. बसवलिंग स्वामी हे गेल्या 25 वर्षांपासून मठाचे पुजारी होते. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी साधूच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. गेल्या महिन्यात श्रीगुरु मदिवालेश्वर मठाचे पुजारी बसवसिद्धलिंग स्वामीजी यांचा मृतदेह बेळगावी जिल्ह्यातील नेगीनहला या गावात आढळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()