Bihar : बिहार विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या, विरोधक आक्रमक

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे.
liquor
liquoresakal
Updated on

पाटणा : बिहार राज्यात दारुबंदी (Liquor Ban) अयशस्वी ठरत आहे. त्याचे उदाहरण मंगळवारी (ता.३०) विधानसभा परिसरात पाहायला मिळाले. येथे अनेक रिकाम्या दारुच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडली आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी स्वतः त्या परिसराची पाहणी (Bihar Assembly) केली. यावरुन त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यावर हल्लाबोल करुन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) म्हणाले, की जेव्हा विधानसभेची सुरक्षा कडक असताना तेव्हा दारुची बाटल्या मिळतात यातून सिद्ध होते की बिहारमध्ये दारुबंदीचा प्रयोग अपयशी ठरला आहे. बिहार विधानसभा परिसरात किती दारुच्या बाटल्या पोहोचल्या. जर बिहार विधानसभेत बाटल्या पोहोचल्या तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. जेथे सीएम स्वतःबसतात तेथून हे ठिकाण १०० मीटरही नसेल. बिहार विधानसभेच्या आत दारुच्या बाटल्या कुठून आल्या? मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी करायला हवी, अशी मागणी यादव यांनी केली. नितीश कुमार यांच्या मंत्र्यांना गुन्हा करण्यास सूट आहे.

liquor
Mahindra लवकरच लाँच करु शकते नवी इलेक्ट्रिक SUV कार

सीएमला बिहारच्या जनतेची माफी मागायला हवी. ते म्हणाले, बेरोजगारी, आरोग्य आणि स्थलांतर आदी मुद्द्यांवर या सरकारने बिहारची बदनामी केली आहे. बिहारमध्ये विषारी दारुने ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यूमुळे टीका होणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमारने नुकतेच मान्य केले होते, की राजधानी पाटणात दारुची विक्री होत आहे. लोक ते पित आहेत. दारुबंदी वरुन नितीश यांना आपला सहकारी पक्ष भाजपच्या टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.