Sahitya Akademi : संगीता बर्वे यांच्या लेखनाचा गौरव; ‘पियूची वही’ला साहित्य अकादमी

बालसाहित्य पुरस्कार : मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या कादंबरीला जाहीर
literature sahitya akademi award announced for sangeeta barves piuchi wahi book delhi
literature sahitya akademi award announced for sangeeta barves piuchi wahi book delhisakal
Updated on

नवी दिल्ली : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार, मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियूची वही’ या कादंबरीला आज जाहीर झाला. या गटात कोकणीसाठी ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयूरी’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. ५० हजार रुपये रोख व ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १४ नोव्हेंबरला (बालदिन) दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. साहित्य अकादमीतर्फे युवा साहित्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. मात्र यात मराठी विजेत्यांचे नाव नाही. मराठी पुरस्कार विजेत्यांचे नाव नंतर जाहीर करण्यात येईल असे अकादमीच्या वतीने सांगण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वतीने आज बालसाहित्य तसेच युवा लेखक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत दोन्ही गटांतील पुरस्कार विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. इंग्रजीसह २२ भारतीय भाषांतील लेखकांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाले. इंग्रजीसाठी आर्शिया सतार यांना (महाभारत फॉर चिल्ड्रेन - कथासंग्रह), हिंदीसाठी क्षमा शर्मा यांना (क्षमा शर्मा यांच्या निवडक कथा), संस्कृतसाठी कुलदीप शर्मा यांना (‘सचित्रम प्रहेलिकाशतकम्- काव्यसंग्रह) तर उर्दूसाठी जफर कमाली यांना (‘हौसलों की उडान’ काव्यसंग्रह) बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. पंजाबीसाठी यंदा कोणालाही पुरस्कार जाहीर झाला नसून संथाली विजेत्यांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. मराठीसाठीच्या परीक्षक मंडळातील एका सदस्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मराठी पुरस्कार विजेत्यांचे नाव आज जाहीर करण्यात आले नाही असे अकादमीच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.

मराठीसाठी परीक्षक मंडळात ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गज्वी, प्रवीण बांदेकर व भारत सासणे यांचा तर, कोकणी परीक्षक मंडळात दामोदर नाईक, हरिश्चंद्र नागर्वेकर व शीला तुकाराम कोळंबकर यांचा समावेश होता.

बार्रेटोंना युवा साहित्य पुरस्कार

तेवीस भाषांतील युवा लेखकांना युवा साहित्य पुरस्कारांचीही घोषणा आज करण्यात आली. कोकणीसाठी युवा साहित्य पुरस्कार मायरन जेसन बार्रेटो यांच्या ‘ताळो’ या निबंध संग्रहास जाहीर करण्यात आला. किरण महांब्रे, एस. एम. कृष्णा राव व शैलेंद्र मेहता यांच्या समितीने बार्रेटो यांच्या पुस्तकाची निवड केली. इंग्रजीसाठी मिहीर वत्स (टेल्स ऑफ हजारीबाग), हिंदीसाठी भगवंत अनमोल (प्रमेय- कादंबरी), संस्कृतसाठी श्रुती कानिटकर (श्रीमती चरितम- काव्यसंग्रह) तर उर्दूसाठी मकसूद अफाक (गिरयाह- काव्यसंग्रह) यांना युवा पुरस्कार जाहीर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.