Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

Devendra Fadanvis: मोदींनी काश्मिरमध्ये तिरंगा फडकवला- फडणवीस

पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील सभेत बोलत होते.

Nilesh Lanke: निलेश लंके यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला

निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला आहे. शरद पवार गटातील प्रवेशानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

Raigad Rain: रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

Kokan Rain: कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातील खेडमध्ये गारा पडल्याची माहिती आहे.

Mumbai News: डोंबिवलीमध्ये वादळी वारा आणि पाऊस

डोंबिवलीमध्ये वादळी वारा आणि पाऊसाला सुरुवात झाली आहे.

Uddhav Thackeray:  जनता यावेळी महायुतीला गाडणार- उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कितीही सभा घेऊ द्या. कारण, त्यांच्या पंतप्रधान म्हणून राज्यातील शेवटच्या सभा आहेत. येत्या निवडणुकीत जनता महायुतीला गाडणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षांचं स्वाती मालिवाल यांना पत्र

ठाणे शहरातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी

बंगळुरु विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात प्रेक्षकांना वाटलं शिळे पदार्थ; गुन्हा दाखल 

ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

डोंबिवली येथे उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे.

पिंपरीत होर्डिंग कोसळलं, चार दुचाकींचं नुकसान

पुण्याती पिंपरीमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली असून त्यामध्ये चार दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालं आहे.

पवारांची सभा सुरु असताना बॅनर कोसळला

शरद पवार यांची सभा सुरु असताना सटाणा येथे बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे.

श्रीकांत शिंदेंच्या संकल्पपत्राचे अनावरण

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे.

या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून,पालकांना उद्यापासून आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.मात्र,यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.

Eknath : पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

पाकिस्तानचे झेंडे चालतील का आणि म्हणून याचा बदला तुम्ही वीस तारखेला घेणार आहात. ते घरी बसलेले आहे, म्हणून मुंबई बॉम्बस्फोटमधला आरोपी इकबाल मुसा याचा प्रचार करताना दिसतोय हे तुम्हाला चालेल का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

PM Modi: शिवाजी पार्कमध्ये मोदींचे कटआऊट हटवले, भाजप कार्यकर्ते संतप्त

शिवाजी पार्क परिसरातील पंतप्रधान मोदी यांचे कटआऊट निवडणूक आयोगाने पोलिसांच्या मदतीने हटवले आहेत. यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांना जाब विचारला.

दिल्ली पोलिसांचे 2 अधिकारी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यावर आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे दोन वरिष्ठ अधिकारी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आप सहआरोपी - अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय (ED) ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की आम आदमी पार्टी (AAP) ला दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सहआरोपी केले जाईल.

Kejriwal PA: केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार यांना उद्या राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बिभव कुमार यांच्यावर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Lok Sabha Election 2024: काँग्रेसला सीएएबद्दल खोटे बोलून दंगल घडवायची होती', पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

पंतप्रधान मोदी काय म्हणाले-

  • सीएएबाबत सपा-काँग्रेसचे स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही. CAA लागू केला जाणार आहे.

  • देशातील जनतेला धर्म आणि जातीच्या नावावर विभागले गेले. आज राष्ट्रवादाचा प्रतिध्वनी आहे.

  • सपा-काँग्रेस, दोन पक्ष आहेत पण दुकान एकच आहे. ते खोटा माल विकतात.

  • मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींचे आरक्षण हिरावून घेऊन विरोधक व्होट बँक म्हणून वापर करत राहिले.

Pune News: पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरूनच पोलिसांच्या दुचाकी चोरीला

  • पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरूनच पोलिसांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

  • पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच "आव्हान"

  • ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत

  • ३ पैकी एक दुचाकी पुण्यातील एका भागात आढळून आली आहे. याप्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही

  • पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंग मधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर

  • अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या घरात

Jayant Patil: माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मॉर्निंग वॉक करताना सोबत

नाशिक येथील गोल्फ क्लब ग्राउंड येथे आज सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळाले.

Jayant Patil and Anil Deshmukh
Jayant Patil and Anil DeshmukhSakal

Madhavi Raje Scindia: माधवी राजे शिंदे यांचे पार्थिव ग्वाल्हेर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई आणि ग्वाल्हेर राजघराण्यातील माजी 'राजमाता' माधवी राजे शिंदे यांचे पार्थिव ग्वाल्हेर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान मोदींच भेटीचं निमंत्रण

शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान मोदींच भेटीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून शांतिगिरी महाराजांना मोदीच्या भेटीचं निमंत्रण दिलं आहे. मात्र, भेट झाली तरी आम्ही माघार घेणार नसल्याचं शांतिगिरी महाराजांनी स्पष्ट केलं होतं. मतदार संघात फिरत असल्यामुळे मोदींची भेट घेऊ शकलो नाही, अशी माहिती शांतिगिरी महाराजांनी दिली आहे.

शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त ब्रिगेडीयर वर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त ब्रिगेडीयर वर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गोळीबार केला होता. भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त ब्रिगेडीयरने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी बंदूकीतून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली होती.

हितेशपाल सिंग असे त्या सेवानिवृत्त ब्रिगेडीयरचे नाव आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नव्हते. या सेवानिवृत्त ब्रिगेडियरला पोलिसांनी अटक केली असून भोर पोलीस ठाण्यात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

मनोज जरांगेंची ८ जूनला होणारी सभा रद्द; काय आहे कारण?

मनोज जरांगेंची ८ जूनला नारायण गडावर होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्यामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज कोल्हापुर आणि शिर्डी दौऱ्यावर

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज कोल्हापुर आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेऊन शिर्डीला रवाना होणार आहेत. आई अंबाबाई आणि शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नायडू पुन्हा आंध्रप्रदेशला परतणार आहेत.

मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झली आहे. महामार्गावर दोन्ही लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेच. सकाळी ८ वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे.

केजरीवालांनी सांगितले अमित शहा केव्हा होणार पंतप्रधान; स्वाती मालिवाल यांच्यावर बोलायचे टाळले

आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाची लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. यावेळी केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

Arvind Kejriwal: ईडीच्या अटकेविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात, आज सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक कायदेशीर आहे असे म्हंटल होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या केजरीवाल हे 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पिठासमोर ही सुनावणी होईल.

Bihar Police: निवडणूक ड्युटीवर असलेल्या ५० जवानांना घेऊन जाणारी बस पलटली

निवडणूक ड्युटीवर 50 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी होऊन खड्ड्यात पडली. या अपघातात सुमारे 20 ते 25 जवान जखमी झाले आहेत. यामध्ये सहा-सात जवान गंभीर जखमी आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूर-समस्तीपूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

PMC: "बेकायदा होर्डिग्ज 7 दिवसांच्या आत हटवा"

पुण्यात असलेले बेकायदा होर्डिग्ज 7 दिवसांच्या आत हटवावे असे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tamil Nadu: चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 4 ठार, 15 जखमी

चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर मदुरांतकम येथे बस आणि लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली. यादरम्यान या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Lok Sabha Election : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ; इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित

ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन आज ठाणे व डोंबिवलीत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची या सभेत प्रमुख भाषणे होणार आहेत. सभांसाठी 'इंडिया'कडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली जात आहे.

Highway Accident : इंदौरमधील महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

इंदौर : बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटाबिल्लोड महामार्गावरील चंदन नगर पुलाजवळ झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, एका बोलेरोने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचे पूर्ण नुकसान झाले. अपघातात प्राण गमावलेले सर्व लोक गुना जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Bangalore School : बंगळुरातील शाळांना बॉम्बची पुन्हा धमकी

बंगळूर : बंगळुरातील आठ खासगी शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळांना धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकांनी घटनास्थळी भेट देऊन कसून पाहणी केली; मात्र स्फोटके सापडली नाहीत. नंतर ही बॉम्बची धमकी बनावट असल्याचे समोर आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Monsoon Season : मॉन्सूनपूर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : संभाव्य महापुरापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा, पूरग्रस्त भागातील नागरिकांची यादी करून आवश्यकता भसल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी पूर्ण करा, धराणातील पाण्याच्या विसर्गाचेही नियोजन करा, वीज, औषधे, चारा यांची व्यवस्था करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. ताराराणी सभागृहात झालेल्या मॉन्सूनपूर्व कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मध्यरात्री चेन्नई-त्रिची महामार्गावर ट्रव्हल्सचा भीषण अपघात; 4 जण ठार तर 15 जण जखमी

तामिळनाडू : चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील मदुरंथकम येथे बसचे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 15 हून अधिक जखमी झालेत. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पडलम पोलिसांनी दिली.

Narendra Modi : PM मोदी आज यूपीत घेणार सभा, केजरीवालही लखनौ दौऱ्यावर

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) आझमगड, जौनपूर, भदोही आणि प्रतापगडमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्यासोबत असतील. पंतप्रधान मोदी सकाळी १० वाजता आझमगडच्या निजामाबाद रोडवरील हुसैनपूर बारागाव फरिया येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करतील.

Sangli, Miraj Railway Station : रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा

सांगली : सांगली आणि मिरज रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्या संशयिताचे नाव रियाज कसाब असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या एका फोनमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती.

N. Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे आज (ता. १६) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. नायडू अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याने शहरातील काही एकेरी मार्ग तात्पुरते शिथिल केले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली. नायडू यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या दौऱ्यादरम्यान काही वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल केले आहेत. त्यांच्या दौऱ्यातील वाहतूक मार्गावरील एकेरी मार्ग तात्पुरते शिथिल केले आहेत.

Army Jawan : कार्वेतील जवानाचा अपघाती मृत्यू

रेठरे बुद्रुक : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या कार्वे येथील जवान अमोल प्रल्हाद थोरात (वय ३७) यांचा काल सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. ते जम्मू- काश्मीरमधील सांबा या सीमेवरील भागात सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीत हवालदार पदावर होते. गेल्या महिन्यात ते गावी सुटीवर आले होते. रजा संपल्याने ते काल सायंकाळी कर्तव्यावर परतताना गावाजवळच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

Kerala Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Latest Marathi News Live Update : देशात उन्हाने होरपळणाऱ्या प्रत्येकाला आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. सांगली आणि मिरज रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्या संशयिताचे नाव रियाज कसाब असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेय. तसेच बंगळुरातील आठ खासगी शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमधील सभेत पंतप्रधानांनी असली आणि नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला धारेवर धरले तर ‘कल्याण’मधील सभेत मोदींनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधलाय. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.