लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र

लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र

Published on

पाटणा : बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) वर ताबा मिळवण्यासाठीचा संघर्ष आता आणखीनच तीव्र झाला आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या काका-पुतण्यांमधील ही वर्चस्वाची लढाई आता घरापासून रस्त्यापर्यंत आली आहे. चिराग पासवान यांचे समर्थक आता पशुपती पारस यांच्या दिल्लीमधील घराबाहेर आंदोलन करत आहेत. ते पारस यांच्यावर पक्षामध्ये हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत आहेत. पशुपती पारस यांचं म्हणणं आहे की, पक्षामध्ये एक पद आणि एक संविधान हा नियम सुरुवातीपासूनच सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये हुकूमशाहीचं वातावरण आहे.

लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र
संधी देऊन सुद्धा ट्विटरचा सहकार्य करण्यास नकार- रविशंकर प्रसाद
लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!, शेलारांचा ठाकरे सरकारवर प्रहार

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिराग पासवान पत्रकार परिषद घेणार होते, काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली आहे. पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर चिराग पासवान यांनी लोकसभा स्पीकरला पत्र लिहलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, लोकसभेत पशुपती कुमार पारस यांना लोजपाचा नेता घोषित करण्याचा निर्णय आमच्या पक्षाच्या राज्यघटनेच्या तरतुदींच्या विरोधात जाणारा आहे. तसेच त्यांनी स्पीकरला त्यांच्या बाजूने नवीन परिपत्रक काढण्याची विनंती देखील केली आहे. लोजपा सध्या दोन गटांमध्ये विभाजीत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हा अंतर्गत कलह आणखीनच तीव्र होताना दिसत आहे. सर्वांत आधी रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती पा रस यांनी पाच सदस्यांसोबत मिळून पक्षावर आपला ताबा मिळवला आहे. तसेच चिराग पासवान यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन काढून टाकलं आहे. लोजपामध्ये सुरु असलेली ही धूसफूस वाढत चालली आहे. आज बुधवारी दिल्लीमध्ये पशुपती पारस यांच्या घराबाहेर चिराग पासवान यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आहे.

लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र
प्रेयसीला आधी शॉपिंगला नेले, नंतर केली हत्या; प्रियकर गजाआड

पारस बनले लोजपाचे नवे अध्यक्ष

गेल्या रविवारपासून पक्षातील अंतर्गत कलह वाढले आहेत. सोमवारी चिराग पासवान यांच्या अनुपस्थितीत पाच खासदारांनी संसदीय बोर्डाची बैठक बोलावली आणि पारस यांना अध्यक्ष बनवलं. याची माहिती लोकसभा स्पीकरना देखील देण्यात आली. पुढच्याच दिवशी लोकसभा सचिवालयातून त्यांना याबाबतची मान्यता देखील मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()