वारानशी (उत्तर प्रदेश): आधुनिक युगातील 11 वर्षाच्या श्रावणबाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स मुलाच्या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम करत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. रोजगार बंद झाल्यामुळे अनेकजण आपल्या घरी परतू लागले आहेत. पण, प्रवासादरम्यान त्यांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तवारे आलम हा 11 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांना सायकल रिक्षामध्ये बसवून सायकल चालवत आहेत. बनारस वरून ते बिहारकडे निघाले आहेत. वडील रिक्षा चालवून थकल्यानंतर मुलगा रिक्षा चालवायला घेतो. आई-वडीलांना सायकल रिक्षात बसून तो चालवताना दिसत आहे. प्रवासादरम्यान हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला असून, रामलखन यादव यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. श्रावण बाळाने कावडीमधून आई-वडिलांना नेले होते. अगदी त्याचप्रमाणे तवारे आलम हा आपल्या आई-वडिलांना रिक्षातून नेत आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळत आहेत. शिवाय, मुलाच्या या जिद्दीला आणि उत्साहाला सलाम ठोकत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.