नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीचा वाढता उद्रेक पाहता लॉकडाउन-5 अपरिहार्य दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी (ता. 31 ) मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमातून त्याची घोषणा करतील, असे दिसते; मात्र याबाबतच्या वृत्ताला गृह मंत्रालयाने दुजोरा दिलेला नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउन-5 चा कालावधी 1 ते 15 जूनपर्यंत असेल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउन वाढवण्याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माध्यमांद्वारे जे समोर येत आहेत, ते केवळ आडाखे आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
देशातील लॉकडाउनच्या प्रत्येक टप्प्यागणिक कोरोना संक्रमण वेगाने वाढत चालले आहे. विशेषतः लॉकडाउन 3 व 4 लागू झाल्यानंतरच्या काळात मेनंतर रुग्णसंख्या रोज विक्रमी म्हणजे 5 ते साडेसहा हजार या गतीने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची अधिकृत संख्या 1 लाख 51 हजार 767 वर पोचली असून, मृतांचा आकडा 4 हजार 337 झाला आहे. बरे होणारे रुग्ण 64 हजार 425 आहेत. हे चित्र पाहता सर्वच्या सर्व बंधने पूर्णपणे उठवणे केंद्र सरकारसाठी व्यवहार्य ठरणार नसल्याचे स्पष्ट आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गेल्या पंधरा दिवसांपासून सज्ज असलेली दिल्ली मेट्रोसेवा सुरू करण्याचा विचार अंतिम टप्प्यात आला तरीही त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.
मात्र या वाढीव काळात विशिष्ट 11 शहरांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न राहतील. लॉकडाउन 5 देशभरात सर्वत्र लागू झाला, त्याचे रंगरूप काहीही असले तरी जेथे कोरोनाचा विशेष प्रभाव नाही अशा 35 ते 40 टक्के भागातील, गेल्या 64 दिवसांपासून घरांमध्ये बंद असलेल्या नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो असेही अहवाल गृह मंत्रालयाकडे आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यांना मिळणार सूट
31 मेनंतर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या धार्मिक व पर्यटन स्थळे, स्थानिक बस व रिक्षा, व्यायामशाळा जिम, स्पा, केशकर्तनालय यासारख्या व्यवसायांना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडकपणे पाळून काही सूट मिळण्याची चिन्हे आहेत.
याच शहरांमध्ये का?
31 मेनंतर केंद्राने काहीही निर्णय घेतला तरी दिल्ली, मुंबई, बंगळूर, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत, कोलकता या 11 शहरांमध्ये, त्यातही कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनची सक्ती कायम राहणार आहे. याच शहरांमध्ये संपूर्ण देशाच्या 70 टक्के रुग्णसंख्या आहे. त्यातही मुंबई, पुणे अहमदाबाद, दिल्ली, कोलकता याच 5 शहरांतील रुग्णसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.