ठरलं! आझमगडमधून डिंपल यादवांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

Dimple Yadav Akhilesh Yadav
Dimple Yadav Akhilesh Yadavesakal
Updated on
Summary

निवडणुकीत सपा, बसपा आणि भाजपमध्ये काट्याची लढत होणार आहे.

आझमगड : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) लोकसभा पोटनिवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Azamgarh Lok Sabha By-election) डिंपल यादव (Dimple Yadav) यांना समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लवकरच डिंपल यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं सांगण्यात येतंय. या बैठकीला आझमगड जिल्ह्यातील सर्व दहा आमदार आणि पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

Dimple Yadav Akhilesh Yadav
सोनियाजी, मी 'त्यांच्या' सांगण्यावरुन काँग्रेस प्रवेश केला, पण..; नगमा संतापल्या

विशेष म्हणजे, आझमगड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत फक्त बसपनं (BSP) आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलीय. अशा स्थितीत डिंपल यादव निवडणूक रिंगणात उतरणार असल्यानं मोठी रंगत पहायला मिळणार आहे. निवडणुकीत सपा (SP), बसपा आणि भाजपमध्ये (BJP) काट्याची लढत होणार आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आझम खान यांच्या राजीनाम्यामुळं आझमगड व रामपूरच्या लोकसभा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत करहलमधून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अखिलेश यादव यांनी आझमगडची जागा सोडली. तर, आमदार झाल्यानंतर आझम खान (Azam Khan) यांनी देखील लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Dimple Yadav Akhilesh Yadav
उत्तर प्रदेशनंतर MIM ची राजस्थानात एन्ट्री; ओवैसींचा पक्ष आजमावणार निवडणुकीत नशीब

दरम्यान, निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी आझमगड आणि रामपूर लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या (Rampur Lok Sabha By-election) तारखा जाहीर केल्या होत्या. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. 26 जून रोजी मतमोजणी आणि निकाल येणार आहेत. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या 13 जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 6 जूनपासून सुरू होणार आहे. 9 जून ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. तर, 10 जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 13 जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रं मागं घेता येणार आहे. 23 जूनला मतदान होणार असून 26 जूनला निकाल लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.