Abhijit Gangopadhyay News : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामझ्ये बंगालच्या १९ जागांवर देखील उमेदवार देण्यात आले आहेत. यामझ्ये कलकत्ता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांना पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसातच त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
अभिजीत गंगोपाध्याय यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना बंगालच्या तामलुक लोकसभा जागेवरून उमेदवार घोषीत केले आहे. विशेष म्हणजे तमलुक ही जागा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचा गड राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीनंतर पक्षाने येथे घट्ट पकड निर्माण केली आहे.
कलकत्ता येथे १९६२ साली जन्मलेले जस्टिस गंगोपाध्याय यांनी कलकत्ताच्या हजरा लॉ कॉलेजातून शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीला त्यांनी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील पश्चिम बंगाल सिव्हील सेवा ग्रेड ए अधिकारी म्हणून काम करत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर कलकत्ता हायकोर्टात एक राज्य वकीव म्हणून वयक्तीक प्रॅक्टिस सुरू केली.
जस्टिस गंगोपाध्याय यांनी आपल्या करियरमध्ये २०१८ मध्ये अतिरिक्त न्यायाधीश पदापर्यंत पोहचले. त्यानंतर दोन वर्षात स्थायी न्यायाधीश बनले. मागील वर्षी एप्रील मध्ये जस्टिस गंगोपाध्याय एका टीव्ही चॅनवर पैशांच्या बदल्यात शाळेत नोकरी दिल्याच्या प्रकरणाबाबत केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यांनी टीएमसी महासचिव अभिषेक बॅनर्जीच्या कथित सहभागासंबंधी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केला होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.