PM Modi Interview : ''इलेक्टोरल बाँड नसतील तर...'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

''निवडणुकीमध्ये खर्च होतो, हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. सर्वच पक्ष, उमेदवार निवडणुकीच्या काळात खर्च करतात. त्यासाठी लोकांकडून पैसे घेतले जातात. परंतु आपली निवडणूक काळ्या पैशांमधून कशी मुक्त होईल, हे बघावं लागेल.''
PM Modi Interview
PM Modi Interview esakal
Updated on

Loksabha election 2024 : निवडणूक रोख्यांची योजना ही निवडणुकीतील काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली आहे. विरोधकांना केवळ आरोप करायचे आहेत. ते आरोप करतात आणि पळ काढतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांवरुन भाष्य केलं.

'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांवरुन होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, घेतलेल्या निर्णयांमध्ये कमतरता असू शकत नाही, असं आपण कधीच म्हणालेलो नाहीत. परंतु निवडणूक रोख्यांवरुन विरोधक देशामध्ये खोटंनाटं पसरवत आहेत. निवडणूक रोख्यांची योजना ही काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर देणगी देणाऱ्या १६ कंपन्यांपैकी ३७ टक्के रक्कम भाजपला आणि ६३ टक्के रक्कम भाजपला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांकडे गेली आहे.

PM Modi Interview
MI vs CSK, IPL: टाईम-आऊट न दिल्याने पोलार्डने घातला अंपायरशी वाद; पण नियम काय सांगतो? घ्या जाणून

पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकांमुळे देश काळ्या पैशांच्या संकटामध्ये ढकलला गेला आहे. इलेक्टोरल बाँडच्या योजनेचे फायदेसुद्धा देशाला दिसले पाहिजेत. राजकारणामध्ये कोणी योगदान दिले, याची माहिती त्यामुळे समोर येते. योजनेमध्ये सुधारणेला वाव असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

''निवडणुकीमध्ये खर्च होतो, हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. सर्वच पक्ष, उमेदवार निवडणुकीच्या काळात खर्च करतात. त्यासाठी लोकांकडून पैसे घेतले जातात. परंतु आपली निवडणूक काळ्या पैशांमधून कशी मुक्त होईल, हे बघावं लागेल.''

PM Modi Interview
अभिनेता Salman Khan च्या निवासाबाहेर गोळीबार; 2 आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जेव्हा निवडणूक रोख्यांचे विधेयक संसदेत मंजूर झाले तेव्हा त्यावर चर्चा झाली होती. आता जे लोक या योजनेला विरोध करत आहेत, तेव्हा त्यांनीच त्याचं समर्थन केलं होतं. जर इलेक्टोरल बाँड नसेल तर पैसा कसा आला आणि कुठे गेला, याता तपास लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.