Rahul Gandhi: पुढीच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडी तयार केली आहे. विरोधी आघाडी INDIA 2024 मधील लोकसभा निवडणूक भाजपच्या विरोधात एकवटून लढण्याच्या तयारीत आहेत. त्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे उद्योगपती गौतम अदानींवर सातत्याने आरोप करत आहेत.
भाजप आणि गौतम अदानी यांनी मिळून देशाला लुटल्याचा आरोप काँग्रेस नेहमीच करत आहे. आता या आरोपांवर काँग्रेसने एक गाणे रिलीज केले आहे. काँग्रेसने Xवर (पूर्वीचे ट्विटर) नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये काँग्रेसने कव्वालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. गाण्याच्या कॅप्शनमध्ये काँग्रेसने लिहिले आहे की, "भाजप आणि अदानींनी मिळून देश लुटला"
कव्वालीच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर आरोप केला आहे की, संसदेत कोणी सरकारला प्रश्न विचारले तर सरकार त्यांचा माईक बंद करते. मोदी सरकारमध्ये अदानी समूहाचे 12,770 कोटींचे कर्जही माफ करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
या व्हिडीओमध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा 20 हजार कोटींचा मुद्दा उपस्थित करताना दिसत आहेत. शेल कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी मोदी सरकारला वारंवार विचारत आहेत की गौतम अदानी यांच्या कंपन्यांना मिळालेले 20,000 कोटी रुपये कोणाचे आहेत?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.