Lok Sabha Election 2024: 'माझा गुन्हा काय'! भाजपमध्ये पहिली बंडखोरी? काँग्रेसने हात केला पुढे

First rebellion in BJP: १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
pm modi amit shah
pm modi amit shah
Updated on

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात. भाजपने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

तिकीट कापल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. काही नेत्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला आहे. काही नेते नाराज आहेत, पण ते बोलून दाखवत नाहीत. मात्र, काही नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थानमधील एका खासदाराने बंडखोरीचे संकेल दिले आहेत. (Lok Sabha Election 2024 First rebellion in BJP first list)

pm modi amit shah
Lok sabha Election: लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना लोकसभा लढत; कोण जिंकलं? जाणून घ्या रंजक किस्सा

देवेंद्र झाझरिया भाजपचे उमेदवार

चुरु लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल कस्वां यांनी उघडपणे पक्षाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, संधी पाहून काँग्रेसने त्यांच्यासमोर हात पुढे केला आहे. चुरु लोकसभा मतदारसंघातून भाजपने पॅरालिम्किप पदक विजेते आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त देवेंद्र झाझरिया यांना तिकीट दिले आहेत. झाझरिया हे भालाफेकपटू आहेत. यामुळे राहुल कस्वां बिथरले आहेत.

राजस्थानमध्ये भाजपने १५ जणांना उमेदवारी दिली आहे. चुरु मतदारसंघ राहुल यांच्या हातून गेला आहे. ४७ वर्षीय राहुल यांना पक्षाचा निर्णय आवडलेला नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस देखील या संधीचा फायदा करुन घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राहुल लवकर काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करु शकतात. मात्र, राहुल कस्वां यांनी याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही.

pm modi amit shah
Lok Sabha Elections 2024: संदेशखाली प्रकरणामुळे लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे राजकीय समीकरणं बदलणार का?

राहुल कस्वां काय म्हणाले?

राहुल कस्वां यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत पक्षाला प्रश्न केले आहेत. तसेच कोणतेही उत्तर मिळत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, माझा गुन्हा काय आहे? मी प्रामाणिक नाही का? मी कष्ट घेत नाही का? मी निष्ठावान नाही का? माझ्यावर काही डाग आहे का? मतदारसंघात काम करण्यात मी कुठे कमी पडलो का?

पंतप्रधान मोदी यांचे विकासकामे राबवण्यात मी सर्वात पुढे होतो. पण, ठीक आहे. राम राम चुरु लोकसभा कुटुंब. संयम ठेवा. मी येत्या काळात पुन्हा तुमच्यासमोर येईन. याची कल्पना तुम्हाला देण्यात येईल, असं ते म्हणालेत.

दरम्यान, राहुल हे जाट समुदायाचे आहेत. चुरु मतदारसंघात जाट समुदायाची संख्या लक्षणीय आहे. राहुल यांचे वडील तीनवेळा या मतदारसंघातून खासदार होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये राहुल कस्वां खासदार आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()