INDIA Alliance : ''इंडिया आघाडी जिंकली तर ४८ तासात पंतप्रधान बनणार अन् NDA मधल्या घटकपक्षांना...'', काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal
Updated on

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर ४८ तासांमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करुन शपथ दिली जाईल, असं विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं आहे. आघाडीमध्ये ज्याला जास्त जागा मिळतील, पंतप्रधान पदासाठी त्यांचीच दावेदारी अधिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जयराम रमेश यांनी पीटीआयला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये काँग्रेसचे महासचिव रमेश यांनी इंडिया आघाडीला २७२ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

congress sonia gandhi rahul gandhi
Akhnoor Bus Accident: काश्मीरच्या अखनूरमध्ये भाविकांची बस खोल दरीत कोसळली! 21 जणांचा मृत्यू, 40 जखमी

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पुढे म्हटलं की, इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येत असेल तर NDA मधील इतर पक्ष आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

congress sonia gandhi rahul gandhi
Wadettivar Vs Danve: जागा मिळवण्यासाठी दानवेंनी पाडलं गरीब कुटुंबाचं घर! वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांसारख्या नेत्यांना इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? या प्रश्नाचं उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, नितीश कुमार हे पलटी मारण्यात तरबेज आहेत. नायडू २०१९ मध्ये काँग्रेससोबत आघाडीत होते. ज्या पक्षांकडे इमानदारी आणि माणुसकी शिल्लक आहे, त्यांना इंडिया आघाडीत स्थान दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.