Lok Sabha Election 2024: भाजपने काँग्रेसचा खिसा कापला? निवडणूक रोख्यांमधून कमावले अन् विरोधकांचे गोठवले

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने आज (गुरुवार) पत्रकार परिकषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकाअर्जून खरगे उपस्थित होते.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने आज (गुरुवार) पत्रकार परिकषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकाअर्जून खरगे उपस्थित होते. निवडणूक रोख्यांमधील ५६ टक्के रक्कम भाजपने गोठवल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.

७० वर्षाच्या इतिहासात कधीही झालं नाही. आता १८ व्या लोकसभा निडणुकीत विरोधकांवर दबाव निर्माण करुन भाजप एकतर्फी निवडणुका करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व पक्षांना नियम समान पाहीजेत, असे खरगे म्हणाले.

टॅक्सबाबत देखील काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने कधी टॅक्स भरला नाही. मात्र आमची खाती गोठवली, असे खरगे यांनी म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीसाठी हे महत्त्वाचे आहे की निवडणुका निष्पक्षपणे पार पडणे आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. मात्र ED, IT आणि इतर स्वायत्त संस्थांवर केंद्राचे नियंत्रण असे असू नये. गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, निवडणूक रोख्यांबाबत समोर आलेल्या तथ्यांमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे."

Lok Sabha Election 2024
Raj Thackrey in Mahayuti: ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ सामना भाजपसाठी लाभदायक? निवडणुकीतील रणनीतीबाबत साशंकता; उद्धव ठाकरेंना नमविण्याचे लक्ष्य

"सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य घोषित केले आहेत. त्या योजनेंतर्गत विद्यमान सत्ताधारी पक्षाने आपल्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केले. त्याचवेळी षडयंत्राचा भाग म्हणून प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे पैशाअभावी निवडणूक लढवण्याची समान संधी मिळत नाही. सत्ताधारी पक्षाचा हा धोकादायक खेळ असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. या देशात लोकशाही हवी असेल तर ती वाचवायला हवी, समतोल खेळायला हवी," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Lok Sabha Election 2024
Patanjali: 'भविष्यात असं होणार नाही..', दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरुन पतंजलीची सर्वोच्च न्यायालयात माफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()