Lok Sabha Election 2024 : 'माझ्या मम्मीचा मतदारसंघ म्हणत...'; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जहरी टीका

मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा तसेच लोकसभेची जागा वडिलोपार्जित मालमत्ता समजल्याचाही आरोप केला.
Lok Sabha Election 2024 PM Modi Slam congress Rahul Gandhi During Campaigning political News
Lok Sabha Election 2024 PM Modi Slam congress Rahul Gandhi During Campaigning political News
Updated on

जमशेदपूर (झारखंड) : काँग्रेसच्या शहजादाकडून (राहुल गांधी) नक्षलवादी भाषेचा वापर होत असल्याने या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योगपती ५० वेळा विचार करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा तसेच लोकसभेची जागा वडिलोपार्जित मालमत्ता समजल्याचाही आरोप केला. लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले,‘‘काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा पाहता कोणताही उद्योगपती या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करेल. नक्षलवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा काँग्रेसचा शहजादा वापरत असून नवनवीन पद्धतींद्वारे पैसे उकळत आहे. या शहजादांकडून वापरल्या जाणाऱ्या उद्योगविरोधी भाषेशी आपण सहमत आहोत का, हे काँग्रेसचे मुख्यमंत्री व ‘इंडिया’ आघाडीने स्पष्ट करण्याचे आव्हान मी देत आहे.’’ मोदी यांचा स्पष्ट रोख राहुल गांधी यांच्याकडे होता.

Lok Sabha Election 2024 PM Modi Slam congress Rahul Gandhi During Campaigning political News
Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांची नाराजी भाजपला भोवणार? कोणते मुद्दे ठरणार प्रभावी

मम्मीच्या मतदारसंघाकडे धाव

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाची खिल्ली उडवित मोदी म्हणाले, की हा माझ्या मम्मीचा मतदारसंघ असल्याचे सांगत शहजादाने रायबरेलीत धाव घेतली. अगदी आठ वर्षांचा मुलगाही असे करत नाही. लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील सुमारे १८ हजार गावांची अवस्था १८ व्या शतकातील गावांप्रमाणे होती, असे ते म्हणाले.

Lok Sabha Election 2024 PM Modi Slam congress Rahul Gandhi During Campaigning political News
Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.