Lok Sabha Election: वाईटात वाईट कामगिरी केली तरी...; शशी थरुर यांनी सांगितलं इंडिया आघाडीला किती जागा मिळतील

lok sabha election 2024: काँग्रेसच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडीच्या पदरी यावेळीही निराशाच पडेल असा अंदाज आहे.
shashi tharoor
shashi tharooreSakal
Updated on

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास फक्त काही तास उरले आहेत. अनेक माध्यम संस्थानी एक्झिट पोल जाहीर केले असून यामध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० जागांच्या जवळ किंवा पार जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडीच्या पदरी यावेळीही निराशाच पडेल असा अंदाज आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक्झिट पोलवरुन देशाच्या जनतेचे पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे, अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे, विरोधकांनी एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडिया आघाडी बहुमत मिळवेल असा दावा त्यांनी केला आहे.

shashi tharoor
Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुवंतपुरमचे उमेदवार शशी थरुर यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'एक्झिट पोल हे काही खरे नाहीत. इंडिया आघाडीने वाईटात वाईट कामगिरी केली तरी २०१९ च्या तुलनेत त्यांची कामगिरी चांगली असेल.' शशी थरुर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

एक्झिट पोलचे अंदाज चकित करणारे आहेत. पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या आकड्यांचा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रियेची काहीही संबंध नाही. काँग्रेसचा संदेश स्पष्ट आहे की, गेल्या १० वर्षात भाजपने फक्त राम मंदिर आणि मोदींची भाषणं याशिवाय काहाही दिलेलं नाही, असं शशी थरुर म्हणाले.

shashi tharoor
Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी करतील. काँग्रेसच्या जागा तीन अंकामध्ये असतील तर इंडिया आघाडी २९५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या फिडबॅकच्या आधारावर हा नंबर दिला आहे. त्यामुळे एक्झिट पोल खोटे ठरतील असं थरुर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.