Mamta Banerjee: सोनिया गांधींसोबत बैठक.. काँग्रेसकडून मनधरणी, तरी ममतांनी नवा पक्ष स्थापन केला!

Mamta Banerjee Founded TMC: ममता बॅनर्जींच्या डोक्यात याच काळात नवा पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु झाली होती. याची चाहुल काँग्रेस पक्षालाही लागली होती
Mamta Banerjee
Mamta Banerjee
Updated on

Lok Sabha Election 2024- राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावं अशी इच्छा ममता बॅनर्जी यांची होती. त्यावेळी ममता या काँग्रेसमध्येच होत्या. सोनिया गांधींना अनुकूल करण्यासाठी ममता या अनेकदा दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांना भेटल्या होत्या. पण, विदेशी असल्याने सर्वजण माझ्या स्वीकार करणार नाहीत असं मत सोनिया यांचं होतं.(tmc mamta Banerjee quit congress and Soniya gandhi and started new party )

ममता बॅनर्जींच्या डोक्यात याच काळात नवा पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरु झाली होती. याची चाहुल काँग्रेस पक्षालाही लागली होती. असं सांगितलं जातं की, सोनिया गांधी यांनी देखील ममता यांना नवा पक्ष स्थापन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. बैठकाही झाल्या होत्या. पण, ममतांनी निर्धार पक्का केला होता. ममता त्यांच्याच पक्षाला खरी काँग्रेस मानत होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या धरतीवरच त्यांनी तृणमूलचा मसुदा, संविधान बनवलं होतं. (Lok Sabha Election 2024)

Mamta Banerjee
इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड

काँग्रेसमधील कार्यकाळाचा शेवट

काँग्रेसकडून ममतांना काही जबाबदारी देण्याचा देखील प्रयत्न झाला. पण, ममता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २२ डिसेंबर १९९७ मध्ये नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे नाव तृणमूल (ग्रासरुट) काँग्रेस असं निश्चित करण्यात आलं. त्यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी त्यांना आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना काँग्रेसमधून काढण्यात आलं होतं. हा त्यांच्या काँग्रेसमधील कार्यकाळाचा शेवट होता.

१ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली. पश्चिम बंगालमधील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. ममता यांनी सुरुवातीपासून पक्षावर पकड बनवली आहे. पक्षाची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. एका नव्या पक्षासाठी हा मोठा विजय होता. शिवाय ममतांनी आपली ताकद दाखवून दिली होती.

Mamta Banerjee
Jalgaon Lok Sabha Election : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल प्रदेश भाजपकडून चौकशी; भाजपच्या अंतर्गत बैठकीतील कथित वाद

काँग्रेसकडून मोहभंग

१९९६ मध्ये ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. ममतांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होण्याची इच्छा होती. पण, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी त्यांचे निकटवर्तीय सोमेन मित्रा यांना पश्चिम बंगाल काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं होतं. सोमेन मित्रा यांचे डाव्या विचारसरणीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. ममता बॅनर्जींना हे आवडणारं नव्हतं.

काँग्रेसचे अधिवेशन

१९९७ मध्ये काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सीताराम केसरी होते. पण, स्टेडियमच्या बाहेर ममता बॅनर्जी यांनी एक सभा आयोजित केली होती. 'इनडोर विरुद्ध आऊटडोर' असा वाद निर्माण झाला होता. सीताराम केसरी यांनी ममतांची समजून घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याचा फायदा झाला नाही.

Mamta Banerjee
ममता बॅनर्जींनी ज्यांच्यासाठी धरणे आंदोलन केलं ते अधिकारी कोण? आता का आलेत चर्चेत?

इंडोर स्टेडियममध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरु होते आणि बाहेर ममतांची सभा सुरु होती. ममतांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. लोकांची गर्दी पाहून ममता भारावून गेल्या होत्या. याच वेळी त्या म्हणाल्या होत्या की, 'आपल्या सभेला येणारे लोक ही खरी ग्रासरुट काँग्रेस आहेत.' काँग्रेसचे अधिवेशन संपले आणि ममतांची सभा देखील झाली. पण, पुन्हा ममतांना काँग्रेसशी जुळवून घेता आलं नाही.

संघर्ष चव्हाट्यावर

ममता बॅनर्जी आणि सोमेन मित्रा यांच्यामधील संघर्ष चव्हाट्यावर आला होता. रोज दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात होती.त्यामुळे डिसेंबर १९९७ मध्ये स्पष्ट झालं होतं की ममता आता काँग्रेसमध्ये जास्त काळ राहणार नाहीत. ममतांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला पण, शेवटी ममतांनी वेगळे होण्याच निर्णय घेतलाच. १ जानेवारी १९९८ मध्ये त्यांनी आपला नवा पक्ष तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. ‘Pandora's Daughters' पत्रकार कल्याणी शंकर यांनी ‘Pandora's Daughters' या पुस्तकात याचा उल्लेख केल्याचं आढळतं.. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.