Lok Sabha Election : ‘आयाराम गयारामां’ना उमेदवारीची लॉटरी

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना बक्षीपत्रा यांना उमेदवारीचे बक्षीस दिले.
Lok Sabha Election : ‘आयाराम गयारामां’ना उमेदवारीची लॉटरी
Lok Sabha Election esakal
Updated on

भुवनेश्‍वर ः ओडिशात ‘आयाराम गयारामां’ची जणू लॉटरीच लागली आहे. सुगीचे दिवस आहेत. निष्ठा बदलणाऱ्या जवळपास सर्वांनाच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीची तिकिटे मिळाली आहेत. पक्षनिष्ठा बदलून दुसऱ्या पक्षाशी घरोबा केल्यानंतर लोकसभेची उमेदवारी बहाल करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे ओडिशा प्रदेश उपाध्यक्ष भृगू बक्षीपत्रा यांचे उदाहरण ताजे आहे. त्यांनी भाजपमधून सत्ताधारी बिजू जनता दलात (बीजेडी) प्रवेश केल्यानंतर काही तासांतच ब्रह्मपूर या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना बक्षीपत्रा यांना उमेदवारीचे बक्षीस दिले.

Lok Sabha Election : ‘आयाराम गयारामां’ना उमेदवारीची लॉटरी
Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

त्याचप्रमाणे २९ मार्च रोजी ‘बीजेडी’मध्ये सहभागी झालेले पश्चिम ओडिशाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेंद्रसिंह भोई यांना बोलनगीर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. यापूर्वी, माजी आमदार आणि काँग्रेसचे केंद्रपाडा जिल्हाध्यक्ष अंशुमन मोहंती यांनाही ‘बीजेडी’ने उमेदवारी दिली. भाजपने यंदा तिकीट नाकारल्याने बक्षीपात्रा नाराज झाले होते. याआधी त्यांनी जेपोर विधानसभा मतदारसंघ आणि ब्रह्मपूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र ‘बीजेडी’च्या तिकिटावर पहिला विजय नोंदविण्यास ते उत्सुक आहेत.

भाजपकडूनही बक्षिसी

पक्षबदलू नेत्यांना उमेदवारी देऊन भाजपनेही त्यांचा सन्मान केला आहे. यातील प्रमुख नाव म्हणजे कटकचे सहा वेळा खासदार असलेले भर्तृहरी महताब आणि माजी मंत्री प्रदीप पाणीग्रही. भाजपने महताब यांना त्यांच्या पारंपरिक कटक मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे तर पाणीग्रही बह्मपूरमधून उभे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.