Loksabha Election : तिकीटवाटपात घराणेशाहीचा बोलबाला!

भाजपकडून सर्वाधिक उमेदवारी; राज्यात एकूण २० उमेदवार रिंगणात
sakal
loksabha electionEsakal
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा विषय चर्चेत असताना महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. घराणेशाहीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक सात उमेदवारांचा त्यात समावेश आहे.

sakal
Satara News : दगाफटका टाळण्यासाठी खासदार उदयनराजेंकडून कऱ्हाड, पाटण दौरा सुरु

कौटुंबिक राजकीय वारसा चालवणारे

दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील प्रतिनिधी लोकसभेच्या रिंगणात आहेत. पैकी अहमदनगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील, हातकणंगलेमधील शिवसेना(एकनाथ शिंदे) पक्षाचे धैर्यशील माने आणि माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे सात, दोन्ही शिवसेनेचे प्रत्येकी तीन, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर असे २० उमेदवार आहेत. २० पैकी महायुतीकडून १३ आणि महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार आहेत.

अहमदनगर

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विखे-पाटील कुटुंबातील तिस-या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे-पाटील केंद्रात मंत्री होते, वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या राज्य मंत्रिमंडळात आहेत.

अकोला

अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे हे विद्यमान खासदार असून चार वेळेस ते निवडून गेले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

sakal
Bournvita News : बॉर्नविटा 'हेल्थ ड्रिंक' कॅटेगरीतून काढून टाका, सरकारने काढली अधिसूचना; नेमकं कारण काय?

बारामती

बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) सुप्रिया सुळे या माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत.

हातकणंगले

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने व त्यांच्या मातोश्री निवेदिता माने याही खासदार होत्या, याच मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील-सरुडकर हे शाहूवाडीचे आमदार होते.

sakal
Dhule News : वकवाड येथील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर; चर्चपाठोपाठ प्रधान भवनाची जागा हडपण्याचा प्रयत्न

कोल्हापूर

महायुतीतील उमेदवार संजय मंडलिक हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आहेत.

ईशान्य मुंबई

ईशान्य मुंबईतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे वडील दिना बामा पाटील हे मुंबई काँग्रेसचे नेते होते.

नंदुरबार

नंदुरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित या विद्यमान मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत, तर येथील काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र आहेत.

sakal
Police News: निवडणुक काळात पोलिस लागले कामाला; दहाही चेकपोस्टवर असणार दिवसरात्र नाकाबंदी

सोलापूर

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

बीड

बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या भगिनी आहेत.

उस्मानाबाद

उस्मानाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील या भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आहेत.

sakal
Dhule News : दोंडाईचात आरोग्य यंत्रणा कोलमडली; उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार दोनच डॉक्टरांवर

माढा

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत.

उत्तर मुंबई

उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे पुत्र आहेत.

रावेर

रावेरमधील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

कल्याण

कल्याणमधील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.

दिंडोरी

दिंडोरीमधील भाजपच्या उमेदवार डॉ.भारती पवार या माजी मंत्री ए.टी.पवार यांच्या स्नुषा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.