Election Fact: उमेदवाराचा मतदान होण्याआधी किंवा निकाल लागण्याआधी मृत्यू झाल्यास काय होतं? जाणून घ्या

Will re-polling take place on the seat?: अर्ज भरला, मतदान झालं अन् त्यानंतर निकासाआधी उमेदवाराचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणात निवडणूक आयोग काय निर्णय घेते असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
election Commission
election Commission
Updated on

Lok Sabha Election- देशात प्रत्येकवेळी कोणत्यातरी भागात निवडणुका होत असतात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. एखाद्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखला केला पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला किंवा अर्ज भरला, मतदान झालं अन् त्यानंतर निकासाआधी उमेदवाराचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणात निवडणूक आयोग काय निर्णय घेते असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? याच प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मोरादाबादचे भाजपचे उमेदवार कुंवर सुर्वेश सिंग (Kunwar Sarvesh Singh) यांचा मतदान पार पडल्यानंतर एका दिवसाने मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पुढे काय होणार? निवडणूक आयोग कोणती प्रक्रिया राबवणार असा प्रश्न लोकांना पडणे साहजिकच आहे. (What happens if candidate dies?)

election Commission
Loksabha Election: आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल, काय घडलं नेमकं ?

मतदान पुन्हा होणार का?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदान प्रक्रिया पार पडली असेल आणि त्यानंतर उमेदवाराचा मृत्यू झाला असेल तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली जाते. जर मतमोजणीनंतर दुसरा उमेदवार विजय झाला तर पुन्हा निवडणुका घेण्याची गरज पडत नाही. पण, जर मृत उमेदवारच विजयी झाला तर निवडणूक रद्द केली जाते आणि त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते.

नियमानुसार त्यानंतर फेरमतदान किंवा पोटनिवडणूक घेतली जाते. कारण, अशा परिस्थितीत निवडून दिलेला उमेदवार लोकांचे प्रतिनिधीत्व करत नाही. लोकांचे प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या अनुच्छेद १५१A नुसार अशा जागेवर निवडणूक आयोगाला ६ महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात.

election Commission
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित

मतदानाआधीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय?

उमेदवाराचा जर अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर मृत्यू झाला असेल. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेली असेल तर अशावेळी त्या जागेची निवडणूक रद्द केली जाते. उदाहरणार्थ, राजस्थानमधील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे करणपूरचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अशा ठिकाणी एका नवीन तारखेला निवडणुका घेतल्या जातात. जेणेकरुन पक्षाकडून अन्य उमेदवाराला तिकीट देण्याची संधी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.