Loksabha Election 2024 : आंध्र प्रदेशात NDA चं जागावाटप फायनल; भाजपला मिळाल्या 'इतक्या' जागा

Andhra Pradesh Election 2024 : आंध्र प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांसाठी एनडीएचं जागावाटप फायनल झालं आहे. राज्यात विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागा आहेत.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024esakal
Updated on

Andhra Pradesh Election 2024 : आंध्र प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांसाठी एनडीएचं जागावाटप फायनल झालं आहे. राज्यात विधानसभेच्या १७५ आणि लोकसभेच्या २५ जागा आहेत.

आंध्र प्रदेशात भाजपसोबत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेवा पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विधानभेच्या १० जागांवर आणि लोकसभेच्या ६ जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. तर जनसेवा पक्ष २१ विधानसभा जागांवर निवडणूक लढवणारअसून लोकसभेच्या २ जागा लढवणार आहे. तर टीडीपी पक्ष विधानसभेच्या १४४ आणि लोकसभेच्या १७ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.

Loksabha Election 2024
Indian Economy: 7 वर्षानंतर प्रत्येक भारतीय सरासरी इतके पैसे कमवणार; 7 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार

आंध्र प्रदेशातील जागावाटपासाठी दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. त्यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत जागा वाटपासंदर्भात वाटाघाटी झाल्यानंतर अखेर फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.

Loksabha Election 2024
Indian Economy: 7 वर्षानंतर प्रत्येक भारतीय सरासरी इतके पैसे कमवणार; 7 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार

'न्यूज १८ हिंदी'ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, विरोक्षी पक्षाने १७ ते २० मार्चदरम्यान एका रॅलीला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केलं आहे. तेलुगू देसम पक्षाच्या दुसऱ्या एका सूत्राने सांगितलं की, नरेंद्र मोदी अशा सभेला संबोधित करत असतील तर ही मोठी गोष्ट आहे. दशकभरात पहिल्यांदा मोदी, नायडू आणि कल्याण एकाच मंचावर असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.