आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आज राजधानी दिल्लीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
पीएम मोदींनी भाजप मुख्यालयात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र जारी केले. पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत की त्यांच्या मते देशात फक्त चार 'जाती' आहेत - तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणुकीतील आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे.
भाजपच्या जाहीरनाम्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- हा योगायोग फार मोठा आहे, आज आंबेडकर जयंतीही आहे. संपूर्ण देश भाजपच्या 'संकल्प पत्रा'ची वाट पाहत आहे. त्यामागचे एक मोठे कारण म्हणजे गेल्या 10 वर्षात भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्टीला अमलात आणले आहे. हे 'संकल्प पत्र' विकसित भारताच्या सर्व 4 मजबूत स्तंभांना - तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी सक्षम करते.
पीएम मोदी म्हणाले की, आमचे लक्ष जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाची गुणवत्ता आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून नोकऱ्यांवर आहे. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, अशी मोदींची हमी आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही खात्री करू.
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पीएम मोदी म्हणाले की, आता आम्ही संकल्प केला आहे की ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्धाला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'भाजप सरकारने गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधली आहेत. आता, आणखी ३ कोटी घरे बांधण्याचे वचन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात पाईपद्वारे स्वस्त स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.