Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे.
Lok Sabha Elections 2024 Prashant Kishor Yogendra Yadav prediction BJP Congress winning  marathi political news
Lok Sabha Elections 2024 Prashant Kishor Yogendra Yadav prediction BJP Congress winning marathi political news
Updated on

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी मतदान पार पडले आहे. यानंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजप ४०० जागा जिंकू असा दावा करत आहे. तर विरोधीपक्ष देखील आपण विजयी ठरू असे सांगत आहेत. यादरम्यान प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव सह अनेक विश्लेषक देखील भाजप देशात किती जागा जिंकेल याबद्दल अंदाज व्यक्त करत आहेत.

चार टप्प्याचे मतदान झाल्यानंतर भाजप ४०० पार करेल अशी घोषणा दिली जात आहे, तर काँग्रेससह विरोधक देशातून मोदी सरकार पायउतार होईल असे म्हणत आहेत. यादरम्यान योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की सध्याची परिस्थिती विरोधकांसाठी अनुकूल असून भाजपच्या अडचणी वाढवणारी आहे.

योगेंद्र यादव काय म्हणाले?

योगेंद्र यादव यांनी सांगितलं की, भाजप सध्या विचार करत आहे की, त्यांना २०१९ प्रमाणे मोठा विजय मिळेल, पण तसं होताना दिसत नाहीये. मी ग्राउंडवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जेव्हा निकाल येतील तेव्हा भाजप २५० हून कमी जगा जिंकेल. तर संपूर्ण एनडीए ला २६८ जागा मिळतील. योगेंद्र यादव म्हणाले की मी स्पष्ट सांगतो की एनडीए सत्तेत येणार नाही. ते म्हणाले की, मला वाटतं की एनडीएला बहुमत देखील मिळणार नाही.

Lok Sabha Elections 2024 Prashant Kishor Yogendra Yadav prediction BJP Congress winning  marathi political news
Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

प्रशांत किशोर यांचा अंदाज काय?

जनसुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी देखील विरोधक मजबूत स्थितीमध्ये असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असताना देखील त्यांनी विजय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचाच होईल असे म्हटले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला बंगाल, ओडिशा, तेलंगाना, तमिळनाडू आणि आंध्र यासारख्या राज्यात फायदा होईल. प्रशांत किशोर यांचा दावा आहे की या राज्यात पक्षाच्या जागा वाढू शकतात. त्यांनी हे देखील सांगितले की भाजपला जवळपास ३०० जागा मिळू शकतात.

प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपची कामगिरी आणि इतर बाबींवरून चर्चा जरी सुरू असल्या तरी देखील उत्तर आणि पश्चिमेत भाजपच्या जागांवर मोठी घट पाहायला मिळत नाहीये. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीच्या कामगिरीबद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की भाजपकडून केला जात असलेला एनडीए ४०० जागा जिंकेल हा दावा वास्तवात खरा ठरताना दिसत नाहीये.

Lok Sabha Elections 2024 Prashant Kishor Yogendra Yadav prediction BJP Congress winning  marathi political news
Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.